Richest Hindu In Pakistan: कंगाल पाकिस्तानातील ५ सर्वात श्रीमंत हिंदू, वर्षाकाठी कोटींमध्ये कमावतात पैसा

Pakistani Hindu billionaires: अल्पसंख्याकांचे दडपशाही करून, विशेषत: हिंदू कुटुंबांवर अत्याचार करून आणि त्यांचे धर्मांतर करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानमध्ये काही हिंदू आहेत ज्यांचे योगदान पाकिस्तानच्या जीडीपीमध्येही (GDP) दिसून येते. या काही प्रभावशाली आणि अतिश्रीमंत पाकिस्तानी हिंदूंनी स्वबळावर हे स्थान मिळवले आहे. आज त्यांची चर्चा होत आहे, कारण गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानातील लोक मैदा, डाळी आणि 10,000 रुपयांना उपलब्ध एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किमतींसाठी संघर्ष करत आहेत. विशेषत: तेथील हिंदू लोकसंख्येची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. तरीही काही हिंदू असे आहेत, ज्यांनी आपल्या क्षमतेच्या जोरावर पाकिस्तानच्या आव्हानांना तोंड देताना कोट्यवधींची संपत्ती निर्माण केली (Richest Hindu in Pakistan) आहे.

दीपक परवानी
पाकिस्तानातील मीरपूरखास येथे 1973 मध्ये जन्मलेले दीपक परवानी (Deepak Perwani) हे पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदूंमध्ये पहिले येतात. दीपक एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेता आहेत. दीपक हिंदू सिंधी समाजातून आले असून त्यांनी अनेक मोठे पुरस्कार जिंकले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर एका अहवालानुसार त्याची वार्षिक संपत्ती 70 कोटी रुपये आहे.

नवीन परवानी
नवीन परवानी (Naveen Perwani) हे पाकिस्तानचे प्रसिद्ध स्नूकर खेळाडू आहेत. 2022 च्या अहवालानुसार नवीन परवानी यांची वार्षिक संपत्ती सुमारे 50 कोटी रुपये आहे.

खातुमल जीवन
खातुमल जीवन हे पाकिस्तानी पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सदस्य असून ते देशाचे खासदार राहिले आहेत. खातुमल यांनी 1988 मध्ये पीपीपीच्या तिकिटावर सिंध विधानसभेची निवडणूकही जिंकली होती. 2022 च्या अहवालानुसार त्यांची वार्षिक कमाई सुमारे 15 कोटी रुपये आहे.

राणा चंद्र सिंह
राणा चंद्र सिंह (rana chandra singh), उमरकोट, सिंध हे पाकिस्तानमधील प्रसिद्ध हिंदू राजकारणी आहेत, जे पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्लीचे सदस्य म्हणजे खासदार म्हणून 7 वेळा निवडून आले होते. त्यांनी प्रदीर्घ काळ कामगार मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदूंच्या यादीतही त्यांचा समावेश होता. त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या संपत्तीची आणि दातृत्वाची आजही चर्चा आहे. 1 ऑगस्ट 2009 रोजी पाकिस्तानातील कराची शहरात त्यांचे निधन झाले.

रिटा
कराचीमध्ये राहणाऱ्या रिटा यांचा जन्म 16 मार्च 1981 रोजी झाला. रिटा या लोकप्रतिनिधी आहेत. 2013 ते 2018 पर्यंत त्या पाकिस्तानच्या संसद सदस्य (एमपी) होत्या. सध्या, रीटा पाकिस्तान मुस्लिम लीग एफशी संबंधित आहेत आणि त्यांची गणना पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला राजकारण्यांमध्ये केली जाते. त्यांची वार्षिक कमाई 30 कोटी पाकिस्तानी रुपये आहे.

संगीता
संगीताचा जन्म पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची येथे झाला. संगीता ही पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहे. संगीता 1969 पासून मनोरंजन क्षेत्रात आहे. मात्र, तिला पाकिस्तानमध्ये संगीताऐवजी परवीन रिझवी (parveen rizvi) या नावाने ओळखले जाते. परवीनने अनेक मोठ्या चित्रपटात काम केले आहे. पाकिस्तानच्या काही मीडिया रिपोर्ट्सनुसार तिची वार्षिक कमाई 40 कोटींच्या आसपास आहे.