जाणून घ्या घराघरात पोहचलेल्या जिलेट कंपनीची यशोगाथा

जाणून घ्या घराघरात पोहचलेल्या जिलेट कंपनीची यशोगाथा

नवी दिल्ली : जर दाढी मोठी झाली, तर तुम्ही एकतर सलूनमध्ये जाल किंवा घरीच शेव्हिंग कराल. दोन्ही प्रकरणांमध्ये ब्लेडची आवश्यकता असते आणि जेव्हा दाढी करण्याचा विषय येतो तेव्हा जिलेटचे नाव येणार नाही असे होऊ शकत नाही. आज आम्ही तुम्हाला याच कंपनीची यशोगाथा सांगणार आहोत.

जिलेटची गोष्ट सांगण्याआधी आम्ही तुम्हाला सांगू की शेव्हिंगचा इतिहास शतकानुशतके जुना आहे. पाषाण युगात सुद्धा मानव दाढी करायचा, होय, तेव्हा ते आजच्याइतके सहज-सुलभ नव्हते. त्यावेळी लोक धारदार दगडांनी दाढी करायचे. १९ व्या शतकापर्यंत दाढी करण्यासाठी ब्लेडचा वापर सुरू झाला होता मात्र चेहऱ्याला त्या काळातील ब्लेड मुळे अनेक जखमा व्हायच्या. किंग कॅम्प जिलेटने लोकांच्या या समस्येची दखल घेतली.

किंग कॅम्प जिलेट या अमेरिकन व्यक्तीने सुरक्षित व गुळगुळीत दाढी करता येईल अशा ‘सेफ्टी रेझर’ची निर्मिती विसाव्या शतकाच्या आरंभी सुरू केली. आणि ‘जिलेट’ च्या उत्पादनांनी विसाव्या शतकाअखेरीस वैयक्तिक प्रसाधनांच्या उत्पादनांत जागतिक बाजारपेठेत आघाडी मिळवलीच शिवाय जागतिक बाजारपेठेत डिस्पोझेबल वस्तूंचा जमानाही सुरू केला.

अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत दाढी करण्यासाठी पारंपरिक वस्तऱ्याचा वापर होत असे. त्याच्या वापरातून गुळगुळीत दाढीऐवजी गालांना इजा होण्याचं प्रमाणच अधिक होतं. इ.स. १८९५ मध्ये सामान्य नोकरदार असणाऱ्या किंग कॅम्प जिलेट यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर धारदार पात्याची छोटी ब्लेड तयार करून ती अनुरूप आकाराच्या रेझरमध्ये बसवण्याची कल्पना त्यांना सुचली.

या नव्या रेझरमुळे दाढी गुळगुळीत तर होईलच, शिवाय सुरक्षितही होईल याची खात्री त्यांना होती. जिलेट यांनी ही कल्पना आपल्या मालकाला पटवून दिली व त्यांच्या मदतीने १९०१ मध्ये परिपूर्ण धार असणारी कार्बन स्टीलची ब्लेड व ती बसवण्यासाठी हँडल असणारं विशिष्ट होल्डर तयार केलं. या उत्पादनाला नाव दिलं गेलं, सेफ्टी रेझर.

१९०३ मध्ये जिलेटचं पहिलं सेफ्टी रेझर बाजारात आलं तेव्हा फक्त ५१ रेझर व १६८ ब्लेडसूची विक्री झाली. पण पुढच्याच वर्षी अमेरिकन लोकांत ते इतकं लोकप्रिय ठरलं की त्या वर्षी ९० हजार रेझर व १ कोटी २५ लाख ब्लेड्सचा धंदा झाला. दरवर्षी हे प्रमाण अक्षरशः शेकड्याच्या पटीत वाढत होतं. परिणामतः पाच वर्षांतच कंपनीला लंडन इथे विस्तार शाखा सुरू करावी लागली. ‘जिलेट’च्या विक्री, विस्ता आणि त्यात सतत सुधारणांसाठी किंग जिलेट अविरत मेहनत घेणे प्रतिस्पर्धी कंपनी ‘विल्कीन्सन स्वोर्ड’ ने पहिलं, स्टेनलेस स्टील ब्लेड विक्रीला आणल्यानंतर ‘जिलेट’ने आणखी पुढे जात ‘सेन्सार’, ‘सेन्सार एक्सेल’ व तत्सम विकसित मॉडेल्स बाजारात आणली.

याबरोबरच उद्योगजगतात ‘डिस्पोझेबल प्रॉडक्ट’ची नवी स्पर्धा सुरू झाली. काळाची पावलं ओळखत ‘जिलेट’ ने आपल्या उत्पादनांची कक्षा वाढवून खास महिलांसाठी या उद्योगातील पहिलं प्रसाधन उत्पादन ‘जिलेट सॅटीन केअर फॉर विमेन’ बाजारात आणलं. काळाच्या व सामान्य लोकांच्या गरजा हेरून व्यवसाय वाढवल्याने रोज वापरातल्या ‘डिस्पोझेबल’ वस्तूंवर ‘जिलेट’चा शिक्का उमटवण्यात किंग जिलेट यशस्वी ठरले.

तेव्हापासून आजपर्यंत, जिलेट नेहमीच त्याच्या रेझरमध्ये काही बदल करत असते. जेणेकरून लोकांना दाढी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. या वैशिष्ठ्यामुळे, जिलेट आजही जगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. त्याने बनवलेल्या ब्लेड आणि रेझरला जगभरात मागणी आहे. असे म्हटले जाते की अंतराळवीर देखील त्यांच्या शेव्हिंग किटचा वापर करतात.

Previous Post
पुण्यात अल्पवयीन विद्यार्थीनीची निर्घृण हत्या हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण – अजित पवार

पुण्यात अल्पवयीन विद्यार्थीनीची निर्घृण हत्या हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण – अजित पवार

Next Post
गांधींनीच सावरकरांना माफिनाफा द्यायला सांगितला होता ? ‘या’ इतिहासकाराने दिलेत पुरावे

गांधींनीच सावरकरांना माफिनाफा द्यायला सांगितला होता ? ‘या’ इतिहासकाराने दिलेत पुरावे

Related Posts
Parth Pawar : पार्थ पवार यांनी घेतली कुख्यात गुंड गजा मारणेची भेट

Parth Pawar : पार्थ पवार यांनी घेतली कुख्यात गुंड गजा मारणेची भेट

Parth Pawar – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांचे (AJit Pawar) चिरंजीव पार्थ पवार यांनी मोक्का,…
Read More
गोपीचंद पडळकर

आम्ही पोलिसांना घाबरणार नाही, हे उद्घाटन महाराष्ट्र बघेल; पडळकरांची डरकाळी 

सांगली – सांगलीतल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद पेटला आहे. खासदार शरद पवारांच्या हस्ते…
Read More
Saddest Country | 'या' 9 देशांचे लोक सर्वाधिक दु:खी आहेत, भारताचा क्रमांक आश्चर्यकारक!

Saddest Country | ‘या’ 9 देशांचे लोक सर्वाधिक दु:खी आहेत, भारताचा क्रमांक आश्चर्यकारक!

Saddest Country | दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या जागतिक आनंद अहवालात कोणते देश सर्वात आनंदी आहेत आणि कोणते देश सर्वात…
Read More