आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येला जा, जेणेकरुन तुमचा अयोध्या दौरा सक्सेस होईल – सय्यद

मुंबई – गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये (Raj Thackrey Tweeted) केले आहे.

राज यांची तब्बेत ठीक नसल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचं सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय. पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे हे अचानक पुणे दौऱ्यावर मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. अखेर काल या चर्चांना पूर्णविराम देत राज यांनी दौरा स्थगित झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलंय.

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावरून खोचक सल्ला दिला आहे. अयोध्यावर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) यांचा हक्क आणि अधिकार आहे. भूमिका स्पष्ट नसलेले नेते स्वतःला हिंदू जननायक संबोधतात पण ते करुन दाखवू शकत नाहीत. राज ठाकरे ना खुलं आवाहन दिलं की, तुम्हाला भीती वाटत असेल तर आताही आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackrey) हात पकडून अयोध्येला जा, जेणेकरुन तुमचा अयोध्या दौरा सक्सेस होईल. भाजपाचा स्लोगन घेवून तुम्ही अयोध्येला जात होतात. त्यामुळे आज नाही उद्या जाणार, उद्या नाही परवा जाणार आता तर जाणारच नाही.