बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule | मतदार, चिन्ह आणि पक्ष फोडण्याचा हा विषय आहे. आमच्यावर सतत वार होत आहे. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी फेअर निवडणुका व्हाव्यात. आम्ही मतदार यादी मागत आहोत त्या द्या. महाराष्ट्रामध्ये अचानक मतदारांची संख्या अचानक वाढली कशी असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली आहे.

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील देखील याठिकाणी उपस्थित आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर यंदा आमदार म्हणून निवडून आले. मात्र उत्तम जानकर यांचं असं म्हणणं आहे की, मी निवडून आलो आहे, परंतु मतदान जे व्हायला हवं होतं, तसे झाले नाही. त्यामुळे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर देखील उत्तम जानकर बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, अशी मागणी करत आहेत. तसेच महाराष्ट्रत असे अनेक विधानसभा मतदारसंघात घडले आहे. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे ( Supriya Sule) म्हणाल्या की, बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा ,“धैर्येशील मोहिते माढातून विजयी झाले. सोलापुरातून उत्तम जानकर आमदार बनले. सोलापूरमधून. त्यांच्या मते त्यांना जी मते मिळाली मरकडवाडी. मी निवडून आलो. पण पाहिजे तेवढे मते मिळाली नाही. त्यांना परत निवडणूक हवी. बॅलेट पेपरवर हवी. पण निवडणूक घेतली जात नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. पण मशीन बंद करा. राज ठाकरेंनीही त्यांच्या उमेदवाराला त्याचंही मत मिळालं नसल्याचं सांगितलं. आम्ही आणि शिवसेना तिथे लढलो. आमचा पक्ष फोडला. आमदार फोडले. आम्ही अजूनही लढत आहोत. आम्हाला तुतारी चिन्ह दिलं. या सरकारमधील एक मंत्री आहेत. त्याने सांगितलं की, साताऱ्यातील सीट एनसीपी पराभूत झाली कारण ट्रम्पेट आणि तुतारीमुळे झाले. आम्ही तुतारी हटवण्याची मागणी केली. सेम चिन्हामुळे लोकांचा संभ्रम होत असल्याचं आम्ही सांगितलं. तरीही त्यांनी चिन्ह बदललं नाही. याच कारणामुळे आमची साताऱ्याची सीट गेली. ११ जागा आमच्या अशा गेल्या, असे सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मतदार, चिन्ह आणि पक्ष फोडण्याचा हा विषय आहे. आमच्यावर सतत वार होत आहे. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी फेअर निवडणुका व्हाव्यात. आम्ही मतदार यादी मागत आहोत. त्या द्या. बाकी काय मागत आहोत.ऑनलाईन नाव वाढवू शकतात. मी रोज मॉनिटर करायचे. शेवटच्या तीन दिवसात आम्ही निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना त्यावेळी ही नाव वाढली. लाडकी बहीण योजनेतही बोगस आधारकार्ड मिळाले आहेत असेही सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.

यावर सविस्तर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणुस अशी दोन नावे निवडणूक आयोगाने दिली. यामुळेच आम्ही साताऱ्याची जागा हारलो. हे पण सत्ताधारी नेते मान्य करत आहेत. हा निवडणूकीची चिन्ह एक देणं, पक्ष फोडणे आणि मतदारांची नावं वाढवणं असा एकत्रितपणाने केलेला हल्ला आहे. तर कधी कधी मशीनचा गैरवापर केला जात आहे. आणि जर देशामध्ये सशक्त लोकशाही ठेवायची असेल तर निष्पक्षपणे घेणे गरजेचे आहे. हारण्याचे कोणतेही दुःख नाही. हे ठरवणारी जनता आहे. पण निवडणूक आयोग हे योग्य आणि पारदर्शक काम करणारे असले पाहिजे. जी मतदारांची यादी आम्ही मागत आहोत ती यादी फक्त द्या, लोकशाहीसाठी आम्ही फक्त ही मागणी करत आहोत, असे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

रूपाली चाकणकरांचं नाव येताच करुणा शर्मांचा गौप्यस्फोट; म्हणाल्या, “त्यांचं काम फक्त नेत्यांना..”

महायुती सरकारचा कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण, बॅटरी स्प्रेअर खरेदीत २३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार | Nana Patole

पराभव स्वीकारण्याची मानसिकता नाही, म्हणून राहुल गांधींची रडारड सुरू – Chandrashekhar Bawankule

Previous Post
कोणीही येणार आणि रस्त्यावर ठेला लावणार असे चालणार नाही; फेरीवाल्यांसाठी डोमिसाईल अनिवार्य

कोणीही येणार आणि रस्त्यावर ठेला लावणार असे चालणार नाही; फेरीवाल्यांसाठी डोमिसाईल अनिवार्य

Next Post
दिल्ली विधानसभेतील यश हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतिक - पवार

दिल्ली विधानसभेतील यश हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतिक – Ajit Pawar

Related Posts
‘मोदी हे तर पूर्वजन्मीचे छत्रपती शिवाजी महाराज’; भाजपा खासदाराच्या विधानाने पेटणार नवा वाद!

‘मोदी हे तर पूर्वजन्मीचे छत्रपती शिवाजी महाराज’; भाजपा खासदाराच्या विधानाने पेटणार नवा वाद!

PM Modi | महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल शासक औरंगजेब यांच्यावरून गोंधळ सुरू आहे. आता एका भाजप…
Read More
LokSabha Election Results 2024 | उदयनराजे भोसले पिछाडीवर; रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून कोण आहे आघाडीवर ?

LokSabha Election Results 2024 | उदयनराजे भोसले पिछाडीवर; रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून कोण आहे आघाडीवर ?

LokSabha Election Results 2024 LIVE Updates | देशाचा पंतप्रधान कोण होणार हे ठरविणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर…
Read More
Share Market

स्टॉक स्प्लिट म्हणजे काय ? यात फसवणूक होऊ शकते का ? 

मुंबई – स्टॉक स्प्लिट (Stock Split) म्हणजे एक शेअर अनेक शेअर्समध्ये विभागणे. यामुळे शेअर्स परवडणारे आहेत आणि पूर्वीपेक्षा…
Read More