प्रयागराज | उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याचा (Mahakumbh 2025) अंतिम टप्पा आता जवळ आला असून, देशभरातून लाखो भाविक त्रिवेणी संगमात पवित्र स्नानासाठी येत आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यात पुण्यातील ‘गिरीश खत्री मित्र परिवार व शिवस्व प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल १५१ भाविकांनी सहभाग घेतला.
भाविकांनी केवळ प्रयागराजच नाही, तर काशी विश्वनाथा चेही दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अध्यात्मिक अनुभूतीचा अमूल्य अनुभव घेतला.
त्रिवेणी संगमात पवित्र स्नानाचा सोहळा
गिरीश खत्री यांनी सांगितले की, “महाकुंभमेळा, प्रयागराज, अयोध्या आणि काशी यात्रा हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. भाविकांनी त्रिवेणी संगमात शाही स्नान करून अध्यात्मिक उर्जेचा अनुभव घेतला. काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी हजारो साधक रांगेत होते. आमच्या गटाने संपूर्ण रात्र रांगेत उभे राहून पहाटे दर्शनाचा लाभ घेतला.”
भाविकांसाठी नियोजनबद्ध सोय
यात्रेतील प्रत्येक भाविकाला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली. यात्रेच्या दरम्यान प्रयागराजमधील पंचदशनम आवान आखाडा चे ठाणा पती श्री दीपक बाबाजी पुरी (गुरु बाबा)यांनी भोजन प्रसाद व विश्रांतीसाठी विशेष व्यवस्था केली होती.तसेच भाविकांना जास्त चलाव लागूनये या साठी विशेष मार्गाने आम्हाला पार्किंग पर्यंत येण्यास सांगितले व तिथून लोकल वाहतुक द्वारे आम्हाला आख्यड्या पर्यंत जाण्याची सोय केली.
महाकुंभ (Mahakumbh 2025) यात्रेचा अनुभव सांगताना गिरीश खत्री म्हणाले, “त्रिवेणी संगमात स्नान करताना जाणवले की, हे केवळ पापमोचन नव्हे, तर आत्मिक जागृतीचे स्थान आहे. हा प्रवास केवळ अध्यात्मिक अनुभूतीचा शेवट नव्हे, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे.”
या यात्रेमुळे सहभागी भाविकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. १४४ वर्षा नंतर होणाऱ्या महाकुंभमेळ्यासारख्या पवित्र आणि ऐतिहासिक सोहळ्याचा भाग होण्याचा योग आला म्हणून भाविकांनी गिरीश खत्री मित्र परिवार आणि शिवस्व प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार मानले.
महाकुंभमेळ्याचा शेवटचा टप्पा सध्या सुरू असून, भाविकांचा ओघ अद्यापही सुरूच आहे. धार्मिक परंपरा आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा संगम असलेल्या या यात्रेमुळे पुण्यातील भाविकांना अनोखा आणि संस्मरणीय अनुभव मिळाला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
‘लव्ह जिहाद’ कायद्याला माझा विरोध | Ramdas Athawale
‘फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील’
सुरेश धस, धनंजय मुंडे भेटीवर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,…