‘तोंडाला काळं फासण्याची घटना लोकशाहीवादी पुरोगामी महाराष्ट्रासाठी अस्वस्थ करणारी’

dilip walase patil - girish kuber

नाशिक : नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले.

रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडल्याची माहिती आहे. गिरीश कुबेर यांच्यावर केलेल्या या शाईफेकीनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व प्रकारावर आता राष्ट्रवादीचे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘नाशिकमधील साहित्य संमेलनात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळं फासण्याची घटना लोकशाहीवादी पुरोगामी महाराष्ट्रासाठी अस्वस्थ करणारी आहे. निषेध व्यक्त करण्याची ही पद्धत योग्य नव्हे. या घटनेचा योग्य तपास करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.’ अस वळसे-पाटील म्हणाले आहेत.

तर, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखक व संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आली. साहित्यिक व पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह आहेत. या घटनेचा तीव्र निषेध. असं म्हणत सुळे यांनी आपली नाराजी दर्शविली आहे.

Previous Post
supriya sule

साहित्यिक व पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह, कुबेरांवरील शाईफेकीचा तीव्र निषेध – सुळे

Next Post
ncp - rupali chakankar

राष्ट्रवादीला कोरोनाचे गांभीर्य आहे की नाही ?, कल्याण-डोंबिवलीत कोरोना नियमांना फासला हरताळ

Related Posts
नाना पटोले

काय नाना तुम्ही पण…; चित्रा वाघ यांनी शेअर केला नाना पटोलेंचा ‘वेगळाच’  व्हिडीओ

मुंबई – महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…
Read More
Navjot Singh Sidhu | ठोको ताली! एका दशकानंतर नवज्योत सिंग सिद्धू आयपीएल कॉमेन्ट्री बॉक्समध्ये परतणार

Navjot Singh Sidhu | ठोको ताली! एका दशकानंतर नवज्योत सिंग सिद्धू आयपीएल कॉमेन्ट्री बॉक्समध्ये परतणार

आयपीएल 2024 च्या (IPL 2024) माध्यमातून जवळपास एक दशकानंतर नवज्योत सिंग सिद्धू ( Navjot Singh Sidhu ) कॉमेंट्री…
Read More
devendra fadanvis

मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प करणारी हंडी उपमुख्यमंत्र्यांनी फोडली

Mumbai – राज्यात आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. दोन वर्षानंतर प्रथमच मोठ्या थाटात सर्वत्र भव्य, दिव्य…
Read More