Ajit Pawar | अजित पवार वेश बदलून कसे गेले? सुरक्षेत मोठी हलगर्जी, मुंबई आणि दिल्ली विमानतळांची चौकशी करा

Ajit Pawar | अजित पवार वेश बदलून कसे गेले? सुरक्षेत मोठी हलगर्जी, मुंबई आणि दिल्ली विमानतळांची चौकशी करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी मुळात अजित पवार (Ajit Pawar) वेश बदलून का जात होते? त्यांच्यात इतके काय शिजत होते? दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिल्ली प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते नाव बदलून प्रवास करतात. अजित पवारांनी (Ajit Pawar) असे केले. उद्या एखादा अतिरेकी हेच उदाहरण घेऊन असे कृत्य करेल. हा पूर्णपणे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. याबाबत मुंबई, दिल्ली विमानतळासह एअरलाईन्सची चौकशी झाली पाहिजे. एअरलाईन्सने ज्यांना ओळखत नाही त्यांना प्रवासाची परवानगी कशी दिली? आम्हालाही आदर कार्ड दिले जाते. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानेही याबाबत उत्तर दिले पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उद्या एखादा अतिरेकी देशात आला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मुळात अजित पवार चोरून वेश बदलून का अमित शहा यांना भेटायला येत होते. त्यांच्यात असे नेमके काय शिजत होते? असा सवाल सुप्रिया सुळें यांनी केला आहे. विशेष म्हणजे अजित पवार त्यांच्यासोबत गेले त्याच्या केवळ पाच दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी अजित पवारांवर आरोप केले. एकीकडे मोदी अजित पवारांवर आरोप करत होते आणि दुसरीकडे अजित पवार अमित शहा यांची भेट घेत होते. नेगोशिएट करत होते. मग ना खाऊंगा ना खाने दुंगा कुठे गेलं? हे वॉशिंग मशीन नाही का? सगळे म्हणतात भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी झालेय. आता देवेंद्र फडणवीस आणि मोदीच याचं उत्तर देतील, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जर शरद पवार साहेबांना माहिती असतं, तर चोरुन जायची काही गरजच नव्हती. अजित पवार ताठ मानेने ऑफिशिअल बुकींग करुन विमानाने गेले असते. कोणी विचारलं, कशाला दिल्लीला चाललात. सहा जनपथ आहे. त्यांच्या काकांचं तर घर आहे, चोरी कसली. हे आपले संस्कार आहेत का? पुढची पिढी काय म्हणेल? त्यावेळी जे विरोधीपक्ष नेते होते, जे आज उपमुख्यमंत्री आहेत, ते नाव बदलून जातात, हे या महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण आहे का? जिथे देशाचे गृहमंत्री नियम कायदे बनवतात, त्यांना भेटायलाच चुकीचं नाव लावून जाता, संविधानाच्या चौकटीत याला जागा नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Prakash Ambedkar | ‘मनोज जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी राज्यात एक नौटंकी सुरू आहे’

Sharad Pawar | महाराष्ट्रात मणीपुरसारखी स्थिती स्थिती निर्माण व्हायला नको, शरद पवारांनी व्यक्त केली भीती

Ajit Pawar | मास्क, टोपी घालून दिल्लीला जायचो; अजित पवारांनी सांगितली महायुतीत जातानाची इनसाइड स्टोरी

Previous Post
Jayant Patil | योजनांच्या जाहिरातीसाठी सरकारकडून तब्बल २७० कोटींचा खर्च; राष्ट्रवादी आक्रमक

Jayant Patil | योजनांच्या जाहिरातीसाठी सरकारकडून तब्बल २७० कोटींचा खर्च; राष्ट्रवादी आक्रमक

Next Post
Chandrashekhar Bawankule | दंगली घडू नये यासाठी पुढाकार घ्या; बावनकुळे यांचे शरद पवारांना आवाहन

Chandrashekhar Bawankule | दंगली घडू नये यासाठी पुढाकार घ्या; बावनकुळे यांचे शरद पवारांना आवाहन

Related Posts

जलील यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादीत यावं, पवार साहेब त्यांना नक्की पक्षात घेतील – भुजबळ

मुंबई – राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून…
Read More
Ambadas Danve | अंबादास दानवेंना शिवीगाळ भोवली, विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबित

Ambadas Danve | अंबादास दानवेंना शिवीगाळ भोवली, विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबित

काल विधीमंडळात उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात तू…
Read More
युक्तिवाद सुरू असतानाच वकिलाला हृदयविकाराचा झटका, कोर्ट रूममध्ये पसरली शोककळा

युक्तिवाद सुरू असतानाच वकिलाला हृदयविकाराचा झटका, कोर्ट रूममध्ये पसरली शोककळा

कोरोनाच्या काळापासून हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये (Heart Attack) झपाट्याने वाढ झाली आहे. दररोज कोण ना कोण हृदयविकाराचा बळी ठरत आहेत.…
Read More