Mumbai- बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांच्या चेहऱ्यावरील कट मार्क ही त्यांची ओळख बनली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी सारख्या मोठ्या अभिनेत्याने कबूल केले आहे की त्याच्या तरुण वयात तो देखील आपल्या चेहऱ्यावर शत्रुघ्न सिन्हासारखा कट बनवायचा प्रयत्न करत असे; जेणेकरून तो शत्रुघ्न सिन्हांसारखा दिसेल. पण शत्रुघ्न सिन्हा यांच्या चेहऱ्यावरील या डागामागील कथा काय आहे? एखाद्या अपघातामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ही खुण निर्माण झाली की यामागची कथा काही वेगळी आहे?
शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, लहानपणी खेळताना त्यांना ही दुखापत कशी झाली जी नंतर त्यांची ओळख बनली. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “काही लोकांना असे वाटते की हे प्राणघातक हल्ला किंवा दुखापतीचे चिन्ह आहे, कदाचित हे एखाद्या पुस्तकात चुकीचे लिहिले गेले आहे. मला या चिन्हाबद्दल आठवत नाही, माझे वडील तेव्हा अमेरिकेत शिकण्यासाठी गेले होते आणि मी खूप लहान होतो. अडीच वर्षांचा असावा, खूप उनाड खोडकर होतो.”
शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, “माझे मामा त्यावेळी अमेरिकेत अभ्यासासाठी जात होते. माझी मावशी आणि माझी आई तयारीत व्यस्त होत्या. माझ्या मामाने मुंडण केले होते आणि नंतर घाईघाईने ब्लेड तिथेच सोडले होते. मी आधी माझ्या बहिणीच्या गालावर मुंडण करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या गालावर दुखापत झाली होती. मी तिला सांगितले की मला कसे दाढी करावी हे माहित नाही. मग मीही माझा शेव केला आणि नंतर माझ्या गालावर ब्लेड लागले. कसे बसे सर्वांनी मिळून गालावरील रक्तस्राव थांबवला पण कटची खूण कायमसाठी राहिली.”
शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, खेळताना त्यांनी केवळ स्वत:चाच नाही तर बहिणीचाही गाल कसा कापला याची संपूर्ण कहाणी त्यांना नंतर सांगण्यात आली. शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, त्यांच्या मामाच्या अमेरिकेला जाण्याची त्यांच्या कुटुंबीयांना इतकी घाई झाली होती की त्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले नाही किंवा टाकेही घातले नाहीत. घरच्यांनी चुलीतली राख लावली, त्यामुळे रक्तस्त्राव थांबला पण चेहऱ्यावर डाग राहिला.