Colgate Company | एकेकाळी साबण-मेणबत्त्या बनवणारी ‘कोलगेट’ कंपनी कशी झाली प्रसिद्ध? एका रणनितीने मिळवून दिली ओळख

Colgate Company | जगात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांची सुरुवात काही अन्य उत्पादनाने झाली, परंतु त्यांना दुसऱ्याच उत्पादनामुळे प्रसिद्धी मिळाली. कोलगेटच्या बाबतीतही असेच घडले. जवळपास 150 वर्षे जुने कोलगेट अमेरिकन उद्योगपती विल्यम कोलगेट यांनी सुरू केले होते. 1875 मध्ये त्यांनी कोलगेट कंपनीची सुरुवात केली. सुरुवातीला या कंपनीत साबण आणि मेणबत्त्या बनवल्या जात असत, पण यातून त्यांना अपेक्षित नफा मिळवता आला नाही. यावर उपाय म्हणून त्यांनी टूथपेस्ट विकण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा टूथपेस्ट पॅकेजिंग  (Colgate Company) तयार करण्यासाठी मशीन्स सहज उपलब्ध नव्हत्या, अशावेळी विल्यम कोलगेट यांनी टूथपेस्ट विकायचे ठरवले. विल्यमने बॉक्समध्ये टूथपेस्ट विकण्यास सुरुवात केल. तूप काढण्यासाठी माणूस ज्या प्रकारे बोटांचा वापर करतो त्याच प्रकारे कोलगेटचा वापर केला जाऊ लागला.

जेव्हा ट्यूबमध्ये टूथपेस्टची ओळख झाली
टूथपेस्ट पॅकेजिंगची समस्या बर्याच काळापासून कायम होती, परंतु 1896 मध्ये पॅकिंजची पद्धत बदलली गेली. टूथपेस्ट प्रथमच ट्यूबमध्ये आणण्यात आली. याद्वारे टूथपेस्ट वापरणे सोपे झाले. या कल्पनेमुळे कोलगेटची लोकप्रियता वाढली. कोलगेट अधिकाधिक प्रसिद्ध होत असल्याचे पाहून पामोलिव्ह नावाच्या कंपनीने 1928 मध्ये कोलगेट विकत घेतले. 1953 मध्ये त्याचे नाव बदलून कोलगेट पामोलिव्ह ठेवण्यात आले.

जेव्हा कोलगेटला खडतर स्पर्धेचा सामना करावा लागला
कोलगेट हा अमेरिकन लोकांमध्ये एक लोकप्रिय ब्रँड बनला होता, परंतु पी अँड जी कंपनीच्या टूथपेस्टने त्याला कठीण स्पर्धा दिली. या कंपनीने फ्लोराईड असलेली टूथपेस्ट आणली होती. लोकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढली, 1955 पर्यंत या कंपनीने कोलगेटला मागे टाकले. कोलगेटला आपली रणनीती बदलण्यासाठी बराच वेळ लागला. या संघर्षाने भरलेल्या काळात कोलगेटला एक गोष्ट समजली होती की, मार्केटमध्ये टिकून राहायचे असेल तर नवीन काहीतरी करण्याची सवय लावावी लागेल. अशा प्रकारे कंपनीने आपली रणनीती बदलली. कंपनीने 1964 मध्ये फ्लोराईड टूथपेस्ट लाँच केली. यामुळे कोलगेटला त्याचा जुना दर्जा मिळाला. यानंतर कंपनीने एकामागून एक प्रयोग केले जे लोकांना आवडले.

कोलगेट टोटल लाँच केले
कंपनीने आपले नवीन धोरण पुढे चालू ठेवले. 1992 मध्ये कोलगेट टोटल नावाचे नवीन प्रोडक्ट बाजारात आले. कंपनीने या प्रोडक्टची तीन वैशिष्ट्ये हायलाइट करून प्रचार केला. त्याच्या वैशिष्ट्यांपैकी, असे सांगण्यात आले की ते दातांमधील मोकळी जागा म्हणजे पोकळी, दातांवरील घाण आणि हिरड्यांच्या समस्यांपासून आराम देते. तीन वैशिष्ट्यांसह या उत्पादनाचे खूप कौतुक झाले. यानंतर, कंपनीने भारतासह जगातील अनेक देशांमध्ये 14 इतर प्रकारची उत्पादने लाँच केली. प्रियांका चोप्रापासून ते करीना कपूरपर्यंत ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आले होते. यानंतर कंपनीने मागे वळून पाहिले नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CM Shinde | आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

Prakash Ambedkar | ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे ताट वेगळेच असले पाहिजे, आंबेडकरांनी स्पष्ट केली वंचितची भूमिका

Nana Patole | आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही

You May Also Like