Anand Paranjape | अंजली दमानिया यांना जी सहजासहजी उपलब्ध होत नाहीत अशी गुप्त कागदपत्रे कशी काय मिळतात आणि ती खरी आहेत की खोटी आहेत याची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
इफ्को कडून खरेदी करण्यात आलेली नॅनो युरिया, अॅटोमॅटीक स्प्रे पंप खरेदी असेल याबाबत आरोप करण्यात आले मात्र त्याचा खुलासा तत्कालीन कृषीमंत्री आणि विद्यमान अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आला आहे. मंगळवारी सुध्दा धनंजय मुंडे यांच्यावर खोटी कागदपत्रे सादर केली आणि मान्यता घेतली असा सनसनाटी आरोप अंजली दमानिया यांनी केला त्याचादेखील खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे.
मंत्रीमंडळ बैठकीचा अजेंडा लीक झाला म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ज्या कागदपत्रांवर मुख्य सचिवांची, कृषी सचिवांची सही आहे, टिपणी आहे. अशा प्रकारच्या कागदपत्रांचा सोर्स आणि त्याची खात्री याचा शोध लागला पाहिजे. लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार आहे परंतु काहीतरी सनसनाटी आरोप जबाबदार मंत्री खोटी कागदपत्रे, खोटी टिपणी तयार करुन २०० कोटीच्या व्यवहाराला मान्यता देतो अशाप्रकारचा जो धादांत खोटा आरोप केला आहे त्या आरोपाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खंडन करण्यात येत आहे असेही आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी स्पष्ट केले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी | Atul Londhe
“बालकांचे संरक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता हा आमचा प्राधान्यक्रम” – Dada Bhuse