काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याबाबत मोठा दावा करताना ते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून बाजूला करतील असे म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना हा दावा उदय सामंत यांनी फेटाळून लावला.
दावोस येथून व्हिडिओ पोस्ट करताना उदय सामंत म्हणाले, विजय, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाले आहेत. मी देखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालेलो आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्यच कुटुंबातून मोठे झालेले आहात. त्यामुळे मला असं वाटतं की दोन सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जर एकत्र असतील, तर त्यांना बाजूला करण्याचे षडयंत्र तुम्ही करु नका, असे उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.
कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना किती वेळा भेटलात, याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. पण मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि त्यामुळेच मी कधीही वैयक्तिक बदनामी होईल, अशी टीका करत नाहीत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन होण्यासाठी प्रयत्न करणार – MP Mohol
शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या १० कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- Dada Bhuse