सत्यजीत तांबेवर मतदारांनी किती विश्वास ठेवावा? छगन भुजबळ यांचा खोचक सवाल

नाशिक – दिवसेंदिवस नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची चुरस वाढत असून यातून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असून महाविकास आघाडी चांगलाच जोर लावताना दिसत आहे. यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (satyajeet Tambe) यांना अद्यापही भाजपने आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही यामुळे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या अडचणी वाढू शकतात. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या वतीने शुभांगी पाटील (shubhangi patil )यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांना देखील दिवसेंदिवस पाठींबा वाढत आहे.

दरम्यान, स्वराज्य संघटनेचे नेते सुरेश पवार (suresh pawar) यांनीही नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.त्यामुळे ही लढत दुरंगी नव्हे तर तिरंगी झाली असून भाजपच्या भूमिकेवर सर्वांचेच भवितव्य अवलंबून असणार आहे.

यातच आता उमेदवारी मिळून देखील अर्ज न भरणे ही पक्ष विरोधी घेतलेली भूमिका अतिशय चुकीची आहे. त्यामुळे विरोधी उमेदवाराच्या जनमानसातील प्रतिमेला तडा गेला आहे. त्यामुळे मतदारांनी किती विश्वास ठेवावा असा सवाल माजी उपमुख्यमंत्री (NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी करत तांबे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भुजबळ म्हणाले की, शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण शुभांगी पाटील यांना आहे. पदवीधर मतदासंघात पहिल्या महील्या उमेदवार म्हणून त्यांचा विजय पक्का असून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी पुन्हा आपल्याला एकत्र यायचे आहे. तो पर्यंत सर्वांनी परिश्रम घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून पूर्ण ताकदीने उभी राहील अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.