Laptopला नुकसान न पोहोचवता कसा साफ करायचा Keyboard? ‘या’ सोप्या ट्रिक्सचा करा वापर

तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये काम करत असलात तरी, तुमच्या लॅपटॉपचा (Laptop) कीबोर्ड घाण होतो. धूळ, बोटांचा घाम, बिस्किटांचे छोटे तुकडे किंवा डोक्यावरील केस कीबोर्डमध्ये (Laptop Keyboard) साचण्याची दाट शक्यता असते. परंतु याकडे आपण सातत्याने दुर्लक्ष करतो किंवा दररोज कीबोर्ड स्वच्छ करण्याइतका वेळ आपल्याकडे राहात नाही. परंतु एक वेळ येते जेव्हा कीबोर्ड साफ करण्याची आवश्यकता भासते. अशावेळी लॅपटॉप कीबोर्ड कसा स्वच्छ करायचा, जेणेकरून त्यावरील लहान की किंवा गॅझेट खराब होणार नाहीत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया… (How To Clean Laptop Keyboard Safely)

लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा
लॅपटॉपच्या कीबोर्डवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव पडल्यास नुकसान होऊ शकते, अशा वेळी कोणते साहित्य वापरण्यासाठी सुरक्षित आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

– मायक्रोफायबर कापड
– मऊ पेंटब्रश
– कापूस
– कंप्रेस्ड एयर
– कीबोर्ड क्लिनर

लॅपटॉपचा कीबोर्ड कसा स्वच्छ करायचा? (How To Clean Keyboard)
1. सर्वप्रथम तुमच्या लॅपटॉपमधून अडॅप्टर काढा आणि ते बंद करा. हे वाइप करताना इलेक्ट्रॉनिक संबंधी कोणतीही अडचण येणार नाही, तसेच कीबोर्डवरून काही अनावश्यक संदेशही टाईप होणार आहे.

2. मग बंद लॅपटॉप व्यवस्थित धरून ठेवा आणि तो उलटा करून स्वच्छ करा. असे केल्याने धूळ, अन्नाचे तुकडे आणि केस जमिनीवर पडतील आणि मग तुम्हाला कीबोर्ड साफ करणे सोपे होईल.

3. आता मायक्रोफायबर कापड, मऊ पेंटब्रश किंवा कोणत्याही कॉम्प्रेस्ड एअर गॅझेटच्या मदतीने लॅपटॉप स्वच्छ करा. हे करताना जास्त जोर लावू नका, हलक्या हातांनी स्वच्छ करा.

4. लिक्विड कीबोर्ड क्लीनर बाजारात उपलब्ध आहेत, पण ते कीबोर्डवर अतिशय काळजीपूर्वक वापरावे लागतात. क्लिनरची थेट कीबोर्डवर फवारणी करू नका. यासाठी मऊ कापड घ्या, त्यावर थोड्या प्रमाणात क्लिनर लावा आणि नंतर मऊ कापडाच्या मदतीने स्वच्छ करा. लिक्विड थेट लावल्यास लॅपटॉपचे सर्किट खराब होऊ शकते.

(नोट- येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्याचा वापर करण्यापूर्वी, तज्ञांचा सल्ला घ्या. आझाद मराठी याची पुष्टी करत नाही.)