सकाळच्या नाश्त्याला काहीतरी हेल्थी आणि टेस्टी खा; १० मिनिटात ‘व्हेज आटा चीला’ बनवा

Healthy Breakfast: आपणा सर्वांना माहिती आहे की, सकाळचा नाश्ता वगळणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण सकाळचा नाश्ता तुमच्या शरीराला दिवसभर ऊर्जा देतो. म्हणूनच हेल्दी नाश्ता घेणे महत्वाचे आहे. परंतु सकाळी मुलांना शाळेला सोडायचे असते, नवऱ्यासाठी पटकन टिफिन तयार करायचा असतो, स्वयंपाक, घरची कामे यांमुळे अनेकदा नाश्ता बनवायचा राहून जातो. अशा परिस्थितीत गृहिणी हेल्दी आणि झटपट बनेल असा नाश्त्याच्या शोधात असतात.

भारतात असे अनेक पदार्थ आहेत जे खायला चविष्ट, आरोग्यासाठी फायदेशीर आणि पटकन बनवता येतात. चीला (Cheela) हा सर्वांचा आवडता आणि सोपा पर्याय आहे. ही फिलिंग आणि फस-फ्री डिश तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त 10 मिनिटांची गरज आहे.

नाश्तासाठी व्हेज आटा चीला कसा बनवायचा:

व्हेज आटा चीला बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

व्हेज आटा चीला बनवण्यासाठी तुम्हाला मैदा, मीठ, दही, ओवा, अदरक, सिमला मिरची, गाजर, बीन्स, कांदे, हिरवी मिरची, ताजी चिरलेली कोथिंबीर आणि चिमूटभर हळद लागेल.

व्हेज आटा चीला रेसिपी (Veg Atta Cheela Recipe):

सर्व प्रथम एका भांड्यात एक वाटी मैदा घेऊन त्यात मीठ, हळद, दही घालून मिक्स करा. नंतर त्यात पाणी घालून चांगले मिक्स करून गुळगुळीत पीठ बनवा. आता त्यात ओवा, अदरक, हिरवी मिरची आणि सर्व भाज्या घालून मिक्स करा. एक तवा गरम करून त्यात थोडे तेल घालून चीलासाठी बनवलेले पातळ पीठ टाकून पसरवा. दोन्ही बाजूंनी चांगले शिजवा आणि तुमच्या आवडीची चटणी किंवा केचप बरोबर सर्व्ह करा.