Whatsapp वरील नको असलेले फोटो-व्हिडिओ थेट गॅलरीत सेव्ह होतात? आताच करा ‘ही’ सेटिंग

सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर फक्त चॅट करण्यासाठी अर्थात मेसेजस पाठवण्यासाठीच नाही तर बऱ्याच आणखी गोष्टींसाठीही वापर केला जातो. व्हॉट्सॲप वर मेसेजसोबतच फोटो, व्हिडीओ,कागदपत्र अर्थात डॉक्यूमेंट्सही पाठवता येतात. व्हॉट्सॲपवर जर तुम्ही ऑटो-डाऊनलोड हा ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला व्हॉट्सॲपवर जे देखील फोटोज किंवा व्हिडीओज येतात ते आपोआप डाऊनलोड होतात. त्यामुळे आपल्याला नको असलेले फोटोज आणि व्हिडीओजही थेट आपल्या गॅलरीमध्ये जातात. अनेकदा एखादा खाजगी फोटो किंवा व्हिडीओ थेट गॅलरीत जाणं आपल्याला पसंत नसेल तर यासाठी काय करावं लागेल, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जर तुम्हाला एखाद्या ग्रुप किंवा चॅटमधील फोटो किंवा व्हिडीओ थेट गॅलरीमध्ये जाऊ नये असं वाटतं तर तुम्हाला त्या स्पेसफिक ग्रुप किंवा चॅटमध्ये जाऊन Visibility बदलावी लागेल. हे करण्याकरता तुम्हाला खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  1. सर्वात आधी व्हॉट्सअॅप ओपन करा. त्यानंतर मेन स्क्रिनवर सर्वात वर असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
  2. त्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन Chats ऑप्शन निवडावा लागेल
  3. त्यानंतर चॅट्समधील सेटिंग्समध्ये Media Visibility हा ऑप्शन दिसेल. त्याला डिसेबल करावं लागेल. ज्यानंतर फोटो आणि व्हिडीओ थेट गॅलरीत दिसणं बंद होईल.