उन्हाळ्यात स्किनची काळजी कशी घ्यावी ?

पुणे – थंडीचे दिवस संपले आणि आता उन्हाळा सुरु झाला आहे. यंदा सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याने या  उन्हाळ्यात त्वचेची काळजी आपण घ्यायला हवी. उन्हाळा सुरु झाला की  आरोग्यासोबतच त्वचेचे प्रॉब्लेम्स ही वाढू लागतात. उन्हाळ्यात त्वचा काळवंडणे, त्वचे वर काळे डाग आणि चट्टे पडणे, त्वचा तेलकट व कोरडी होणे, त्वचे वर घामोळ्या येणं अशा अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला काही अगदी सोप्या टिप्स फॉलो  करायच्या आहेत.

काय करावे?

१. प्रखर उन्हात बाहेर पडू नका. उन्हाळ्यात सूर्य किरणे प्रखर असतात अश्या सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या त्वचे वर लाल चट्टे , काळे डाग असे पडू शकतात आणि तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी गरज नसताना उन्हाळ्यात घर बाहेर पडू नका आणि जर काही कामासाठी तुम्ही बाहेर पडताय तर पुढची टीप आहे ती पाळून तुम्ही बाहेर पडू शकता.

२. घरातून बाहेर पडताना स्कार्फ, कॅप घाला.  प्रखर उन्हातील तीव्र किरणांचा त्वचेवर लगेच परिणाम होतो त्यामुळे सनबर्न टाळण्यासाठी तोंडावर कॉटनचा स्कार्फ बांधा ज्यामुळे तुमच्या त्वचेवर थेट सूर्यकिरण पडणार नाहीत.

३. घराबाहेर पडताना Sunscreen नक्कीच लावा. ऋतू कुठलीही असो Sunscreen लावणे फार महत्वाचे आहे कारण Sunscreen लावल्यावर त्वचेचा थेट उन्हासोबत संपर्क टाळता येतो.

४. उन्हाळ्यात जास्त मेकअप करू नका कारण उन्हाळ्यात खूप घाम सुटतो आणि त्यामुळे मोकळ्या झालेल्या त्वचेच्या छिद्रांमध्ये मेकअपचा थर जाऊन बसलेला असतो. यामुळे त्वचेच्या आतील भागाचा संपर्क मेकअप मध्ये असलेल्या केमिकल्स सोबत झाल्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात.  तुम्हाला पिंपल्स, पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स चा त्रास होऊ शकतो.

५. उन्हाळ्यात  भरपूर पाणी प्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे असते. वाढलेल्या तापमानामुळे शरीराचे तापमान कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी शरीरामधून भरपूर घाम सुटत असतो त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी अनियंत्रित होऊन जाते  आणि उन्हाळ्यात पाणी कमी पिल्यास त्वचा कोरडी होते.  कोरड्या त्वचेमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आणि डिहायड्रेशनमुळे उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे थोड्या थोड्या वेळाने  पाणी पीत राहा. त्याने त्वचा नितळ आणि चमकदार दिसेल. ह्याबरोबरच शरबत व फ्रुट ज्यूस हे तुमच्या डाएट मध्ये ऍड करा यामुळे तुम्ही फिट राहाल.