हृतिक रोशनची माजी पत्नी सुजैन खान नवीन घरात शिफ्ट, मुलांची अशी प्रतिक्रिया

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि त्याच्या एक्स पत्नीच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहते निराश झाले होते. घटस्फोटानंतर सुझैन तिच्या बिल्डिंग फोर बंगलोजमध्ये राहायची, पण आता सुझैनने तिचं घर बदललं असल्याच्या बातम्या येत आहेत. सुझैन खान आता तिची दोन मुले हृदान आणि रेहान यांच्यासह क्लबजवळ असलेल्या एका नवीन आलिशान इमारतीत शिफ्ट झाली आहे.

सुझैन आणि तिच्या मुलांचे एक अद्भुत नवीन घर आहे, हृतिक रोशनच्या नवीन सी-फेसिंग घराजवळ. सुझानने हे नवीन घर भाड्याने घेतलेले नसून तिने ते स्वतः घेतले आहे. या घरात 4 किंवा त्यापेक्षा जास्त खोल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सुझान आणि तिची मुले नुकतेच येथे राहायला गेली आहे. असेही बोलले जात आहे की हृतिकही अनेकदा सुझानच्या नवीन घरी जात असतो.

हृतिक अनेकदा सुझैनच्या घरी जाताना दिसला आहे. तो सुझानच्या घरी जातो, विशेषतः मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी.   हृतिक रोशनने 2000 मध्ये त्याच्या बालपणची मैत्रीण आणि गर्लफ्रेंड सुजैन खानशी लग्न केले. पण नंतर 2014 मध्ये दोघांनी काही वैयक्तिक कारणामुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला.सुझैन सध्या अर्सलान गोनीला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याला दुजोरा दिला नसला तरी अनेकदा ते एकत्र दिसले आहेत.

हे देखील पहा