पुणे | राज्यातील २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे (HSRP number plate) बंधनकारक करण्यात आले आहे. ‘पुणे प्रादेशिक परिवहन विभागा’ने (आरटीओ) वाहनधारकांना लवकरात लवकर HSRP बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी ३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
HSRP म्हणजे काय?
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP number plate) ही विशेष सुरक्षितता असलेली नंबर प्लेट आहे. १ एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व नवीन वाहनांसाठी ती अनिवार्य करण्यात आली होती. आता २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठीही ही अट लागू होणार आहे.
HSRP चे फायदे
वाहन सुरक्षितता वाढते
वाहन चोरीचा धोका कमी होतो.
वाहनांचे ट्रॅकिंग शक्य होते
बनावट नंबर प्लेट्सवर नियंत्रण ठेवता येते
HSRP ची वैशिष्ट्ये
ॲल्युमिनियम किंवा टिकाऊ धातूपासून बनवलेली प्लेट
युनिक लेझर कोड आणि होलोग्राम स्टिकर
इंजिन व चेसिस क्रमांक असलेली सुरक्षा प्रणाली
छेडछाड न करता वापरण्याजोगी प्रणाली
HSRP कसे बसवायचे?
राज्यभर ३ खासगी एजन्सी अधिकृतपणे HSRP बसवण्याचे काम करणार आहेत. लवकरच ऑनलाइन अपॉइंटमेंट पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.
३१ मार्चनंतर काय होणार?
सध्या HSRP संदर्भात जनजागृती मोहीम सुरू आहे. ३१ मार्चनंतर कोणती कारवाई होईल, याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही, वाहनधारकांनी वेळेत HSRP बसवून घेण्याचे आवाहन आरटीओ विभागाने केले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या | Atul Londhe
मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर, १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार