राखीच्या धोखाधडीच्या आरोपांवर पती आदिलने सोडले मौन; म्हणाला, “मला सुशांत सिंग बनायचं नाही”

आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) याच्यासोबत लग्न केल्यापासून राखी सावंत (Rakhi Sawant) हिचा ड्रामा संपता संपत नाहीये. बॉलीवूडची ड्रामा क्विन राखीने तिचा पती आदिलवर धोखाधडीचा आरोप केला आहे. आदिलचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असून त्याने राखीला फसवले आहे, असा आरोप तिने केला आहे. अखेर आता राखीच्या आरोपांवर आदिलने मौन सोडले आहे.

नुकतेच राखीने पती आदिलवर धोखाधडीचा आरोप केला होता. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये राखी तिचे लग्न वाचवण्याबाबत बोलताना दिसत आहे. तसेच, तिच्या आणि आदिलच्या नात्यात जो कोणी येईल, त्याला सोडणार नाही, असा इशाराही देताना दिसत आहे. राखीच्या या आरोपांबाबत आदिलने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक लांबलचक पोस्ट टाकली असून मनातली भावना व्यक्त केल्या आहेत.

आदिल म्हणाला, ‘मी जर कोणाच्या पाठीमागे बोललो नाही तर त्याचा अर्थ मी चुकीचा आहे असे होत नाही. मी तोंड उघडून काय चालले आहे ते सांगितले तर माझ्यावर आरोप करणाऱ्यांची तोंड बंद होतील. म्हणूनच तिला (राखी) रोज येऊन लोकांना सांगायचे आहे की आदिल वाईट आहे. ज्या प्रकारे तिने मला सांगितले की, ती फ्रीजमध्ये राहील. यावर मी एवढेच म्हणतो की, मला सुशांत सिंग राजपूत बनायचे नाही. मी सर्वांना विनंती करतो की मला जज करणे थांबवावे. कोण कसे आहे ते काळच सांगेल.’

आदिलने पुढे लिहिले की, ‘तो मीच होतो. माझ्यासारखा समजूतदार माणूस नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहिला आहे, ज्याने तिला चांगली जीवनशैली दिली आहे. मी एक रुपया घेऊन मुंबईला आलो होतो, हे म्हणायला खूप सोपे आहे. चांगले केले, तू तुझी योजना उत्तम प्रकारे राबवली. पण हुशार मार्गाने नाही. मला हिरो आणि झिरो कसे व्हायचे हे माहित आहे. मीडिया मी तुमचे पाय धरतो. मीडिया तुम्ही आदिलकडे का जात नाही? कारण तो तथ्यांसह बाहेर येईल की तुम्हाला कशाची भीती वाटते?’