मी दुधाचा धंदा करणारा माणूस आहे, आजही माझा गोठा आहे – अजित पवार 

पुणे – मी दुधाचा धंदा करणारा माणूस आहे. आजही माझा गोठा आहे. पहिल्या 10 गाईंना 5 खोंडं आणि 10 कालवड व्हायची पण आपण नवीन तंत्रज्ञान आणून 10 च्या 10 कालवडी होऊ शकतात असं तंत्रज्ञान विकसित केले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते, यावेळी ते बोलत होते.

दुधात काही ठिकाणी युरिया टाकतात, साखर टाकतात, दुधात साखर टाकली की डिग्री वाढते. मागे आम्ही कायदा केला होता भेसळ केली तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी असली मागणी केली. तेव्हा तो कायदा विचार पूर्वक केला. परंतु त्यावर राष्ट्रपतीनी त्यावर सही केली नाही. मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्यावर कडक कारवाई केली पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असे अजित पवार म्हणाले.

वाढपी जवळचा असेल तर आपल्या जवळच्या लोकांना जास्त देतो. मी राज्यातील सर्वच भागात वाढणार आहे. परंतु जेव्हा बारामती आणि निंबूचा विषय येईल तेव्हा एखादी पळी जास्त वाढेल. अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी, कामागरझ महिला, विद्यार्थी यांना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला, असे अजित पवार म्हणाले.