‘आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही’

Nawab Malik

गोंदिया – आर्यन खान प्रकरण चर्चेत आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप हे आमने-सामने आले आहेत. यातच आज पुन्हा एकदा मलिक यांनी विरोधकांवर हल्लबोल केला आहे. सोशल मिडियावर लाल कपडे टाकून नवाब मलिक घाबरतील… आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही अशा शब्दात नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

गोंदिया जिल्हयाच्या दौर्‍यावर असताना माध्यमांनी विचारलं असता नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला. या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहेत. सोशल मिडियावर लाल गाठोड दाखवत आहेत असे चोर लोक माझ्याकडे बोट दाखवत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी नाव न घेता केला.

मी भंगारवाला आहे… अशा रद्दी माझ्याकडे दहा – वीस आणि शंभर टन आहेत. आम्ही चोर नाही… आम्ही डाकू कडून सोनं घेतलं नाही… बँका बुडवल्या नाहीत… त्या वानखेडेशी कुणाचा काय संबंध आहे… कुठल्या हॉटेलचे कोण मालक आहे… त्या हॉटेलमधील वस्तू क्रुझवर कशा गेल्या… क्रुझवरील कॅटरिंग मध्ये ड्रग्ज कसे गेले… आता नावं घ्यायला सुरुवात केलेली आहे… इतकं का घाबरताय असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

 

Previous Post
'इतिहास घडविणाऱ्या महापुरुषांचे विचार आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहेत'

‘इतिहास घडविणाऱ्या महापुरुषांचे विचार आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहेत’

Next Post
दीपावली साजरी करताना नागरिकांना करावे लागणार 'या' नियमांचे पालन, अन्यथा कारवाई अटळ

दीपावली साजरी करताना नागरिकांना करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन, अन्यथा कारवाई अटळ

Related Posts
आलिया भट्टचे लिव्हिंग रुममधले फोटोज लीक; चिडलेला रणबीर कपूर म्हणाला, त्यांच्यावर कायदेशीर...

आलिया भट्टचे लिव्हिंग रुममधले फोटोज लीक; चिडलेला रणबीर कपूर म्हणाला, त्यांच्यावर कायदेशीर…

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आलिया भट्ट (Aliya Bhatt) हिचे प्रायव्हेट फोटो लीक झाले होते. आलिया तिच्या लिव्हिंग रूममध्ये बसली…
Read More
sanjay raut

इथून पुढे  25 वर्ष भाजपची सत्ता येणार नाही; मुंबईत पोहोचताच संजय राऊत यांची डरकाळी 

 मुंबई – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत (sanjay raut) दिल्लीत होते. याचदरम्यान संजय…
Read More
लग्न करेल तेव्हा...; महाराष्ट्राची हरिणी गौतमीचे लग्नाची मागणी घालणाऱ्या बीडच्या 'त्या' पाटलाला उत्तर

लग्न करेल…; महाराष्ट्राची हरिणी गौतमीचे लग्नाची मागणी घालणाऱ्या बीडच्या ‘त्या’ पाटलाला उत्तर

नुकतीच बीडच्या रोहन गलांडे पाटील या तरुणाने नृत्यांगणा गौतमी पाटील हिला लग्नाची मागणी घातली होती. बीड जिल्ह्यातील केजच्या…
Read More