मी सावरकर नाही, राहुल गांधी आहे; कॉंग्रेसची पोस्टरबाजी

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald Case) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले आहेत. राहुल गांधी आज ईडीपुढं जबाब नोंदवणार आहेत. मात्र दुसरीकडे आता काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर सूडाच्या राजकारणात गुंतल्याचा आरोप केला आहे आणि आम्ही माघार घेणार नसल्याचे  म्हटले आहे.

दरम्यान,  ईडीच्या या कारवाई विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या समन्स विरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर एक पोस्टर लावले आहे. हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर ‘सत्य झुकेगा नही’! असं लिहलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थनार्थ अनेक पोस्टर्स लावण्यात आल्याचे वृत्त आहे. या पोस्टर्समध्ये लिहिले आहे की, प्रिय मोदी आणि शहा, हे राहुल गांधी आहेत, झुकणार नाही.  मी सावरकर नाही, राहुल गांधी आहे, असेही पोस्टर्समध्ये लिहिले आहे.