मुंबई – गेल्या काही दिवसांपासून आमदार नितेश राणे आणि खासदार संजय राऊत (MLA Nitesh Rane and MP Sanjay Raut) यांच्यात शाब्दिक खडाजंगी सुरु आहे. यातच आता आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा राऊत यांच्यावर टीका केली आहे. येत्या तीन महिन्यांत संजय राऊत पुन्हा तुरुंगात जाणार असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
“मी बेट लावून सांगतो की पुढच्या तीन महिन्यांत हा जेलमध्ये जातो की नाही पाहा. तीन महिन्यांनंतर हा तुम्हाला बाहेर दिसणार नाही. पत्राचाळच्या केसमध्ये आरोप निश्चित झालेला आहे. आता हा ९० दिवसांचा मेहमान आहे. ९० दिवसांनी हा तुरुंगात दिसणार”, असा दावाही नितेश राणेंनी केला आहे.
“संजय राऊतांना सरकार पाडायचं होतं आणि स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं. २०१९ पासून उद्धव ठाकरेंच्या पदाला सुरूंग लावण्याचं काम करत होता. ज्या खुर्चीवर याचा डोळा होता त्या खुर्चीवर पवार साहेबांनी ठाकरेंना बसवलं. त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या खुर्चीच्या खाली टाईमबॉम्ब लावण्याचं काम संजय राऊतांनी केलं”, असंही नितेश राणे म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=nnDThEISWHk