मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना  मी त्यांना व्यक्तिशः ओळखत नाही – पवार 

मुंबई  – कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराबाबत ( Koregaon Bhima Case ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नुकतीच कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर नोंदवण्यात ( Sharad Pawar Koregaon Bhima Inquiry ) आली.  माजी मुख्य न्यायाधीश जेएन पटेल (Former Chief Justice JN Patel) आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक (Former Chief Secretary Sumit Malik) हे या आयोगाचे सदस्य आहेत.

यावेळी कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हे पोलिसांचे अपयश आहे. सर्व यंत्रणा असतानाही त्याचा योग्य वापर न झाल्यामुळे हा हिंसाचार घडला ( How did Koregaon Bhima’s violence erupt ) असल्याची साक्ष शरद पवारांनी आयोगासमोर दिली. या प्रकरणांमध्ये असामाजिक तत्वांना वेळीच आवर घालण्यात पोलिसांना सपशेल अपयश आलं असल्याची साक्ष शरद पवार यांनी आज चौकशी आयोगासमोर दिली.

मिलिंद एकबोटे (Milind Ekbote ) आणि संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्याविषयी वर्तमानपत्रांमध्ये वाचल्याने मला त्यांच्याविषयी माहिती आहे, मी त्यांना व्यक्तिशः ओळखत नाही, अशी साक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाला दिली.