‘मला बाबासाहेबांनी आरक्षण दिले म्हणून मी विधानसभेत निवडून आलो, मला शरद पवाराने आरक्षण दिले नाही’

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे आमदार राम सातपुते यांना उद्देशून भाषण केल्यानंतर भाजपाचे आमदार राम सातपुते चांगलेच संतापले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला.

मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले म्हणून मी विधानसभेत निवडून आलो, मला राष्ट्रवादीच्या शरद पवाराने आरक्षण दिले नाही, असे वक्तव्य केल्यानंतर विधानसभेत एकच गोंधळ उडाला. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला.दरम्यान, भाजप आमदार राम सातपुते यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ झाला.