‘मी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलंय की मी घाबरणारा नाही,मला तुमच्या सुरक्षेची गरज नाही’

 मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीनंतर  ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांना देखील जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर येत आहे.खासदार राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही फोनवरुन जीवे मारण्याची धमकी आली असल्याचे समोर आले आहे.

संजय राऊत यांना ८ जून रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास धमकी आली. ही धमकी सुनील राऊत यांच्या फोनवर आली. फोन करणारा व्यक्ती हिंदीतून बोलत आहे. त्याने संजय राऊत यांना सकाळी ९ चा भोंगा बंद करायला सांगा, त्यासाठी एका महिन्याची मुदत देतो, अन्यथा त्यांना गोळी मारु, अशी धमकी दिली आहे.

दरम्यान, याबाबत बोलताना संजय राऊत आज म्हणाले, सगळे धमकी देणारे लोक भाजपा पुरस्कृत आहेत. मी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलंय की मी घाबरणारा नाही. मला तुमच्या सुरक्षेची गरज नाही असे राऊत यांनी म्हटले आहे.