Akshata Apte | लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमाची (Chhaava Film) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. अभिनेता विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पात्राचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही वाहवाह मिळवली आहे. अनेक मराठी अभिनेते-अभिनेत्रीही या सिनेमावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान एका मराठी अभिनेत्रीला मात्र छावा सिनेमा आवडलेला नाही.
नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीलाला त्रास देणाऱ्या श्वेताचे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षता आपटे (Akshata Apte) हिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले की, छावा बद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा आपण एकदाच पाहू शकतो असा आहे. जे आपल्याला आधीच माहिती आहे तेच दाखवले. पहिला भाग एवढं काही नाही, पण दुसरा भाग छान आहे. सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे पण स्क्रिप्ट चांगली नाही. सिनेमाचं म्युझिक म्हणजे बिग नो… अजिबात चांगल नाही. दिग्दर्शन चांगलं पण आहे आणि वाईट पण. कॉस्च्युम आणि हेअर मेकअप फार छान आहे. विकी कौशलने खूप उत्तम भूमिका साकारली आहे. अक्षय खन्ना सुद्धा विकी कौशलच्या तोडीस तोड अभिनय करतोय. पण रश्मिका मंदाना यासाठी अजिबात योग्य नाही. बाकीचे सहाय्यक कलाकार उत्तम आहेत.
एकंदरीत मनोरंजन म्हणून पाहण्यासाठी हा एक चांगला सिनेमा आहे. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या परिस्थितीतून जावं लागलं त्याबद्दल अजून जाणून घ्यायच्या अपेक्षा होती. इतर प्रेक्षकां प्रमाणेच मला सुद्धा शेवटचा क्षण पाहून खूप रडू आलं पण चित्रपटाच्या प्रभावामुळे असं झालेलं नाही. आपण महाराजांचा आदर करतो म्हणून आपल्या भावना दाटून आल्या. दुर्दैवाने सिनेमात रश्मिकाचा तोच एक्सेंट ऐकायला येतो.
तिची अभिनय करण्याची स्टाईल सुद्धा आपण साउथ सिनेमांमध्ये पाहिले तशीच आहे. त्यामुळेच तिला महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत स्वीकारणं अजिबात जमत नाहीये. विकी कौशल या चित्रपटात उत्तम काम केले आहे त्याला त्या रूपात आपण यापूर्वी पाहिलं नाहीये. स्क्रिप्ट मध्ये आणखी वैविध्यपूर्णता असती तर त्याला आणखी वेगळ्या पद्धतीने दाखवण्याची संधी मिळाली असती. सिनेमात खूप कमी संवाद मराठीत दाखवले आहेत. त्यांनी हा सिनेमा मराठी मध्ये का बनवला नाही? मराठी लोकांना आणखी कनेक्ट होता आलं असतं….
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मनसे नेत्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न? राज ठाकरे संतापले!
शरद पवारांचं राजकारणातलं स्टेटस मोदींपेक्षा मोठं, पंतप्रधानांच्या त्या कृतीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार? भगव्या स्टेटसने राजकीय चर्चांना उधाण