समर्थ रामदास शिवरायांचे गुरू होते हे मी शाळेत वाचलं – रावसाहेब दानवे

औरंगाबाद – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चांगलेचचर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केल्याने नवा पेटला आहे. चाणक्याशिवाय चंद्रगुप्त नाही तसंच समर्थांशिवाय शिवाजी महाराज नाहीत असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी समर्थ रामदास यांचा शिवाजी महाराजांचे गुरु असा उल्लेख केल्यामुळे आधीच शिवभक्त प्रचंड नाराज आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत असताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेले एक वक्तव्य देखील सध्या बरेच चर्चेत आहे. ‘समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते. मी असेच शाळेत वाचले आणि शिकलो आहे’ असं वक्तव्य केले आहे. न्यूज 18 लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यात काही ठिकाणी पडताना पाहायला मिळाले होते. काही संघटनांनी तसेच काही राजकीय नेत्यांनी देखील राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. सोबतच कोश्यारी यांनी माफी मागावी अशी देखील मागणी केली आहे.