मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती, पण …; संजय राऊत याचं बाणेदार उत्तर 

Mumbai – महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दावा केला आहे की, शिंदे गटाकडून त्यांना गुवाहाटीला (Guwahati) जाण्याची ऑफर देखील देण्यात आली होती. ते म्हणाले,  मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती, पण मी तिथे गेलो नाही. त्याचे कारण सांगताना ते म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरेंवर (Balasaheb Thackeray) विश्वास ठेवतो. जेव्हा सत्य तुमच्या बाजूने असते तेव्हा कोणाला भीती वाटते ?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत शुक्रवारी 1 जुलै रोजी मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी ईडीसमोर (ED)  हजर झाले. तेथे त्याची सुमारे 10 तास चौकशी करण्यात आली. संजय राऊत सकाळी 11.30 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयाकडे निघाले होते आणि रात्री 10 च्या सुमारास तेथून निघताना दिसले.  ईडीसमोर हजेरी लावण्याबाबत संजय राऊत म्हणाले, देशाचा एक जबाबदार नागरिक या नात्याने देशाच्या कोणत्याही तपास यंत्रणेने बोलावले तर आपण जावे. अधिकाऱ्यांनी मला चांगली वागणूक दिली, त्यांनी पुन्हा बोलावले तर मी पुन्हा जाईन.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार किमान 14 खासदार शिवसेनेविरोधात (Shivsena) बंड करू शकतातअशी भीती व्यक्त केली जात आहे याबाबत बोलताना शिवसेनेत भीती निषिद्ध असल्याचे संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) आज राज्याचे मुख्यमंत्री झाले असतील, पण ते शिवसेनेचे नसल्याचे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्पष्ट केले आहे.