‘लिलावतीतला थयथयाट पाहून मला राखी सावंत यांची आठवण आली’

मुंबई – खासदार नवनीत राणा (Mp navneet rana) यांच्याविरोधात शिवसेना एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तुरूंगातून (Jail) सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर रूग्णालयात त्यांच्या एमआरआयसह (MRI) विविध तपासण्या होत असताना झालेली व्हिडीओ शुटींग (Video Shooting) आणि फोटो (Photos) समोर आल्यानंतर यावरून शिवसेनेने रुग्णालयात जात राडा घातला.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar), आमदार मनिषा कायंदे (manisha kayande) , राहुल कनाल(Rahul Kanal) यांच्यासह काही शिवसेना नेते आज लिलावती रुग्णालयात जाऊन धडकले होते. त्यांनी रुग्णालय प्रशासनास विविध प्रश्न विचारून जोपर्यंत याचे उत्तर दिले जात नाही तोपर्यंत आम्ही रुग्णालयातून हलणार नसल्याची भूमिका घेतली. यावेळी रुगणालयात जाऊन प्रशासनाला शिवसेना नेत्यांनी जाब विचारला.

यावेळी नवनीत राणा यांचा सीटी स्कॅन (CT Scan) करतानाचा फोटो व्हायरल झाल्यामुळे तिथे फोटो कसा काढण्यात आला, याविषयी हॉस्पिटलने स्पष्टीकरण देण्याची मागणी करत राणांवर झालेल्या उपचारांविषयी शंका उपस्थित करण्यात आली.या घडामोडींवर आता मनसेचे फायर ब्रांड नेते योगेश चिले (MNS fire brand leader Yogesh Chile यांनी भाष्य केले आहे.

लिलावतीतला थयथयाट पाहून मला राखी सावंत यांची आठवण आली… लिलावतीतल्या पत्रकार परिषदेत आणि राखीजी घेतात त्या पत्रकार परिषदेत गुणात्मक फरक अजिबात नव्हता… लगे रहो राखीताई… असं चिले यांनी म्हटले आहे.