‘माझ्या बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार’

बीड – बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून शिरूर(shirur)  तालुक्यातील आनंदगाव(Aanandgoan)  शिवारात सकाळी एका शेतामध्ये 65 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने या शेतकऱ्यावर वार करून त्यांची हत्या केली(The farmer was attacked and killed by a sharp weapon)  आहे. कुंडलिक सुखदेव विघ्ने(Kundlik Sukhdev Vighne)  असं मृत शेतकऱ्याच नाव असून त्यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीमुळे पोलिसांसमोर मारेकर्‍याला पकडण्याचं आव्हान उभ राहिलं आहे.(Beed Crime News)

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार,  शेतात आपल्या पिकाची राखण करण्यासाठी  गेलेले वडील सकाळी आपले वडील घरी परत का आले नाहीत हे पाहण्यासाठी त्यांचा मुलगा शेतात गेला असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी त्या ठिकाणचा पंचनामा केला. त्यावेळी  मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली. माझ्या बायकोचा खून झाला असून जोपर्यंत माझ्या बायकोच्या मारेकर्‍यांना अटक होत नाही तोपर्यंत कुणाचं सत्र सुरूच राहील असा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे.

मारेकर्‍यानं या चिठ्ठीमध्ये त्याच्या बायकोचा खून करण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी सुपारी दिली त्यांच्या नावाचा उल्लेख केला असून त्यांना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी विनंती केली आहे. तर लवकरच पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षकांची आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनं चिठ्ठीत नमूद केलय.