‘चंद्रकांत पाटील यांनी मला त्यांच्या खिशात ठेवले तर मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार’

मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नव्हतं… मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकतायत असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो असे वादग्रस्त वक्तव्य केले होते त्या वक्तव्याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मला त्यांच्या खिशात ठेवले तर मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे त्यासाठी चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.