मी एकलव्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहणार – सदाभाऊ खोत

मुंबई – विधान परिषदेच्या (Legislative Council) 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे तर काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान (Election) होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे तर त्या निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीत (MVA) अविश्वासाचे वातावरण आहे.

दरम्यान, या निवडणुकीत भाजपच्या पाठींब्यावर मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot, head of Rayat Kranti Sanghatana) यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. या पार्श्वभूमीवर एबीपी माझा बरोबर बोलताना खोत म्हणाले, मी ज्या ठिकाणी होतो, त्याठिकाणी एकनिष्ठ काम केलं आहे. मी शरद जोशी (Sharad Joshi) यांच्याबरोबर होतो, त्यांच्याबरोबर एकनिष्ठेनं काम केलं. आज मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याबरोबर आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत देवेंद्र फडणीवस यांच्यासोबत प्रामाणिक राहणार असल्याचं खोत यांनी सांगितलं.

एकलव्याप्रमाणे ( Eklavya) मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहणार असल्याचा खुलासा यावेळी सदाभाऊ खोत यांनी केला. मी त्यांचे नेतृत्व स्वीकारलं आहे. माझ्या रक्तात दरबारी राजकारण नाही. मी मैदानावरचा सैनिक आहे. सामान्य माणसांसाठी मी राजकारणात पाऊल ठेवल्याचं खोत यांनी सांगितले.