नोटीस पाठवण्याइतके माझ्याकडे कोणते घबाड आहे, हाच प्रश्न मला पडला – राजन साळवी

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांनी आज पत्रकार परिषद घेत एसीबीकडून आलेल्या नोटिशीनंतर पत्रकार परिषद घेतली. आमदार साळवी यांनी म्हटले की, राजकीय उलथापालथीनंतर मी निष्ठावंत राहिलो. मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली नाही. त्यामुळेच मला ACB ची नोटीस आली आहे.असा आरोप त्यांनी केला आहे.

यंत्रणाचा वापर करत नोटीस दिल्या जात असल्याचा आरोप साळवी यांनी केला. ज्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ताचा आरोप ते भाजपमध्ये (BJP) जात आहेत. मलादेखील तुम्हाला तुरुंगात डांबणार अशा धमक्या देण्यात आल्या असल्याचा दावा साळवी यांनी केला. आपण एसीबीच्या नोटिशीला घाबरत नसून चौकशीला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. नोटीस पाठवण्याइतके माझ्याकडे कोणते घबाड आहे, हाच प्रश्न मला पडला असल्याचेही साळवी यांनी म्हटले.