IAS Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar Controversy) वादात एक मोठे अपडेट समोर येत आहे. यूपीएससीने पूजा खेडकरविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यूपीएससीला प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात आली होती. पूजा यांनी परीक्षेत दिलेल्या शिथिलतेचा गैरफायदा घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांनी आपले नाव तसेच आई-वडिलांचे नाव, फोटो, ईमेल आयडी, स्वाक्षरी, मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलून ओळख लपवण्याचा प्रयत्न केला.
पूजा खेडकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासोबतच केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली आहे. नागरी सेवा परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या नियमांच्या आधारेच त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. सीएसई 2022 मधील त्याची उमेदवारी रद्द केली जात आहे आणि भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षा किंवा सरकारी नोकरीसाठी त्याला अपात्र घोषित केले जात आहे.
यानंतर पूजा खेडकरांच्या प्रकरणात आता दिल्ली क्राईम ब्रँचही तपास करणार असल्याने खेडकरांचा पाय आणखी खोलात चालल्याची स्थिती आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांवर खोटे दिव्यांग प्रमाणपत्र बनवून परीक्षा दिल्याचा आरोप करण्यात येतोय. तसेच कोट्यवधींची संपत्ती नावावर असताना ओबीसी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटही त्यांनी काढल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कार्मिक मंत्रालयाने एक समिती नेमली असून दोन आठवड्यात त्याचा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Nana Patole | काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचा स्वाभिमान राखणार, राज्याला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही
Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादवला टी20 संघाचा कर्णधार बनणं पडलं महागात! वनडेतून झाला बाहेर