चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील सर्वात मोठा सामना, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan), २३ फेब्रुवारी रोजी दुबई येथे खेळला जाणार आहे. न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर यजमान पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे पाकिस्तानसाठी भारताला हरवणे खूप महत्वाचे आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने पाकिस्तानवर दंड ठोठावला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून ६० धावांनी पराभव पत्करावा लागला. कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तान संघाला मॅच फीच्या (India vs Pakistan) पाच टक्के दंड ठोठावण्यात आला.
ग्राउंड पंच रिचर्ड केटलबरो आणि शरफुद्दौला, थर्ड पंच जोएल विल्सन आणि फोर्थ पंच अॅलेक्स व्हार्फ यांनी आरोप निश्चित केले. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी दंड ठोठावला. पाकिस्तानच्या मॅच फीच्या ५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली आहे. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने गुन्हा कबूल केला. त्यानंतर कोणत्याही औपचारिक सुनावणीची आवश्यकता नव्हती.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
ससूनजवळील मोक्याच्या जागेवरून भाजप-शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता
अंजली दमानिया यांचे पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोट्या आरोपांचे प्रदर्शन – Dhananjay Munde