क्या यार बेXXXX! कर्णधार रोहितचा संयम सुटला, टीममेटलाच केली शिवीगाळ; Video Viral

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 चा अंतिम सामना (WTC Final) इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ (INDvsAUS) कसोटी चॅम्पियन होण्यासाठी आमनेसामने आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 327 धावा केल्या असून ते विजेतेपदाच्या लढतीत चांगल्या स्थितीत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवसाखेर ट्रॅव्हिस हेडने 146 आणि स्टीव्ह स्मिथने 95 धावा केल्या आहेत. भारताने 76 धावांत ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र यानंतर फलंदाजीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) वेगवान धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले आहे.

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाची चौथी विकेट काढता आली नाही. त्यामुळे कॅप्टनच फ्रस्ट्रेशन वाढणं स्वाभाविक आहे. पण तोल सुटता कामा नये. रोहित शर्माच्या बाबतीत नेमकं हेच घडलं.

दिवसाच्या शेवटच्या सत्रात ही घटना घडली. कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या साहाय्याने ट्रॅव्हिस हेड आणि स्टिव्ह स्मिथ यांची भागीदारी मोडण्यासाठी प्रयत्नशील होता. मात्र जडेजा गोलंदाजीला आला असताना मैदानावरील क्षेत्ररक्षक फिल्ड सेट करताना कर्णधार रोहितचे म्हणणे ऐकताना दिसत नाहीत. त्यामुळे रोहित चिडतो. “काय यार तुम्ही ….”, असे म्हणत रागाच्या भरात रोहितकडून सहकाऱ्यांबद्दल अपशब्द निघतात.  रोहितचे हे शब्द स्टंप माईकमध्ये कैद झाले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.