एक महिला बापूंच्या विरोधात बोलल्याने गैरसमज निर्माण होतील हा कुणाचा समज असेल तर ती चूक आहे – मलिक

मुंबई – अशी एक महिला दिवसभर मलाना क्रीम घेऊन बसते व बोलते तिच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही. जे प्रचारक आहेत जे अशा लोकांना पुढे करत आहेत त्यांना कळलं पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले आहे.

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम आधीपासूनच सुरू आहे. खोटा इतिहास सांगणे, खोटी माहिती उपलब्ध करून देणे अशा पध्दतीने वारंवार असे लोकं बोलत आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.

कंगना राणावत हिने महात्मा गांधींजींचा अपमान करण्याचे काम केले केले आहे. अहिंसा हे विचार जगाने स्वीकारले आहेत. हिंसेने कुठलेही विषय सुटत नाही. त्यामुळे ठरवलं तर अहिंसेच्या मार्गाने काहीही प्राप्त करु शकतो मात्र तिने बापूंचा अपमान का केला आणि तिचा बोलविता धनी कोण आहे हे देशाला माहीत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

ज्या लोकांनी बापूंची हत्या केली ते पण बापूंना बगल देऊ शकत नाही. बापूंचे विचार देशात, जगात लोकांनी स्वीकारले आहेत. एखादी महिला बापूंच्या विरोधात बोलल्यावर लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतील हा कुणाचा समज असेल तर ती चूक आहे असे स्पष्टपणे नवाब मलिक यांनी सांगितले.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

‘दंगलीच्या सूत्रधारांना जेरबंद करण्याऐवजी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने खटले दाखल केले जात आहेत’

Next Post

काँग्रेसला मोठा धक्का ; मराठवाड्यातील ‘या’ दिग्गज नेत्याने केला समर्थकांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

Related Posts
ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर; करुणा शर्मांचा संताप

ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर; करुणा शर्मांचा संताप

Karuna Sharma | संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुंडे यांच्या खासगी…
Read More
पेडणेकर - राणा

घाणेरड्या पिक्चरमध्ये जिने काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही- पेडणेकर

मुंबई : शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. यातच आता शिवेसना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar)…
Read More
ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे मनातील स्वप्न पूर्ण केले ते शरद पवार होते - आव्हाड

ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे मनातील स्वप्न पूर्ण केले ते शरद पवार होते – आव्हाड

मुंबई – बीआरएस पक्ष (BRS) ज्या उद्देशाने महाराष्ट्रात येत आहे ते यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. राज्यातील जनता मुर्ख…
Read More