ईडी, सीबीआयचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर ते मुर्खाच्या नंदनवनात आहेत – शरद पवार

कोल्हापूर – केंद्रसरकार ईडी (Ed), सीबीआयचा ( CBI ) वापर करुन काम बंद करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते मुर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. राष्ट्रवादी याचा नक्कीच समाचार घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (National President of NCP Sharad Pawar)  यांनी कोल्हापूर येथील जाहीर संकल्प सभेत दिला. काल राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूरमध्ये जबरदस्त शक्तीप्रदर्शन केले. या संकल्प सभेत शरद पवार यांनी सर्वच विषयांना हात घालताना केंद्रसरकारवर जोरदार निशाणा साधला.

ही सभा ऐतिहासिक अशी आहे. गेले वर्षभर अनेक संकटे असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जयंत पाटील (Jayant Patil) व त्यांचे सहकारी यांना घेऊन प्रचंड दौरा केला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मोहिमेचा समारोप शाहू नगरीत होतोय त्याबद्दल अभिनंदन. संघर्षाचा काळातून आपण जातोय त्यामुळे देश व राज्य एकसंघ ठेवण्याचे आव्हान आहे. २०१४ मध्ये परिस्थिती वेगळी होती. मनमोहन सिंग ( Manmohan Singh ) यांच्या नेतृत्वाखाली उन्नतीची खबरदारी घेतली गेली होती. मात्र २०१९ मध्ये भाजपची (BJP) सत्ता आली. लोकांचा कौल होता. परंतु सत्तेचा उपयोग कसा होतोय हे आपण बघत आहोत. समाजातील सर्व घटक एकत्र राहतील ही नेतृत्वाची जबाबदारी असते परंतु आज दिल्लीत हल्ले, जाळपोळ झाली. केजरीवाल यांच्या हातात सत्ता आहे परंतु गृहखातं अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्या हातात आहे. देशाची राजधानी एकत्र राहण्याची खबरदारी घेतली नाही. दिल्लीत काही घडले की त्याचा संदेश जगात जातो असेही शरद पवार म्हणाले.

मागच्या आठवड्यात कर्नाटकात (Karnataka) होतो. तिथेही जातीय दंगली झाल्या. समाजातील लहान घटक आहेत तिथे अल्पसंख्याक लोकांबद्दल जाहीर बोर्ड लावले आहेत खरेदी न करण्याचे यातून काय संदेश देतो आहोत. हा संदेश सत्ताधारी देत आहेत. भाजपची सत्ता त्याठिकाणी असे प्रकार घडत आहेत याबाबत नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली.

कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी उमेदवार दिला त्याला विजयी केल्याबद्दल आणि उत्तम काम केल्याबद्दल व आघाडी धर्म पाळल्याबद्दल शरद पवार यांनी कोल्हापूरकरांचे अभिनंदन केले. निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार आहे परंतु विध्वंस वाढेल असा प्रकार झाला त्याबद्दल शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. काश्मीर पंडितांवर सिनेमा आला त्यात अत्याचार दाखवण्यात आला. त्यात जातीय संघर्ष दाखवला गेला आहे आणि त्यातून मताचा जोगवा मागण्याचा प्रयत्न झाला. माणसामाणसामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.असं ते म्हणाले.