मोदी-शहांनी सांगितलं तर मी घरी बसायलाही तयार आहे – देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून, शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान देऊन आज एकनाथ शिंदे सरकारने (Eknath  Shinde Gov) आपलं बहुमत सिद्ध केलं. अनेक अडचणी समोर असतानाही एकनाथ शिंदेंनी ही किमया करुन दाखवली.   एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा नुकताच शपथविधी झाला. तर विधानसभेतील दोन दिवसीय विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं बहुमतापेक्षा मोठा आकडा गाठून आपलं सरकार मजूबत असल्याचं दाखवून दिलंय.

दरम्यान, काल राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच ठाण्यातील त्यांच्या घरी गेले. यावेळी त्यांचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत झालं. तर आज उपमुख्यमंत्री नागपुरात पोहोचले. यावेळी माध्यमांशी बोलताना पक्षश्रेष्ठींनी सांगितलं तर मी घरी बसायलाही तयार आहे. कारण माझ्यासाठी पक्षादेश सर्वोच्च स्थानी आहे. मी सरकारमध्ये बसणार नव्हतो. पण त्यांनी सांगितलं, तू तिथे जा. म्हणून मी उपमुख्यमंत्री झालो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस  यांनी दिली. तसेच मी अजिबात नाराज नाही तर माझ्यासाठी पक्षादेश हा सर्वोच्च आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

ते म्हणाले, मी ठरवलं होतं. मी सरकार बनविल पण सरकारमध्ये जाणार नाही. तशी घोषणा केली होती. पण राष्ट्रीय अध्यक्षांनी माझं नाव अनाऊन्स केलं. जेपी नड्डा J.P. Nadda) आणि शहा (Amit Shah) बोलले. मोदींशी (P.M. Modi) बोलल्यावर मी सहभागी झालो. शेवटी पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे. मोदी शहा नसते तर नागपूरचा (Nagpur)  माणूस कधीच मुख्यमंत्री झाला नसता. त्यांनी आदेश दिला तर मी घरी बसायला तयार आहे. पण त्यांनी तर माझा सन्मान केला. त्यांनी सांगितलं भाजपच्या (BJP) संपूर्ण १०६ लोकांचं नेतृत्व तू करतोस. तू सरकारमध्ये जा आणि उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घे.आणि मी जबाबदारी स्वीकारली. असं ते म्हणाले.