जर राष्ट्रवादी मोठा भाऊ काँग्रेस लहान भाऊ तर उबाठा हा काय सावत्र भाऊ आहे का?

Mumbai – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (State Opposition Leader Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ आहे असं सूचक वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायचा आहे. मात्र त्याआधीच आम्ही मोठा भाऊ आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवारांनी सांगितलं आहे. राजकीय वर्तुळात या वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे.

याच मुद्द्यावरून शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या जात्यात आठा आणि उठा यांचे पीठ झाल्याशिवाय राहणार नाहीअसं ज्योती वाघमारे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी बेडकीचा कितीही फुगवून बैल केला तरी तो बैल आता बसलेला आहे. प्रत्यक्ष जागा वाटपापर्यंत तर त्या बैलाचा मच्छरच होईल. जर राष्ट्रवादी मोठा भाऊ काँग्रेस लहान भाऊ तर उबाठा हा काय सावत्र भाऊ आहे का? संजय राऊत डीएनए टेस्ट ची गोष्ट करतात म्हणजे दोन हाणा पण आम्हाला तुमचा भाऊ म्हणा हीच यांची भूमिका आहे का? अशी खरपूस टीका शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली आहे.