राहुल गांधी तयार नसतील तर प्रियंका गांधी यांना पक्षाच्या अध्यक्षा करा – आचार्य प्रमोद कृष्णम

उदयपूर – राजस्थानमधील उदयपूर (Udaipur in Rajasthan) येथील काँग्रेसच्या चिंतन शिबिरात प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याकडे कमान सोपवण्याची मागणी करण्यात आली आहे. चिंतन बैठकीत शनिवारी पक्षाचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishnam) म्हणाले की, प्रियंका गांधी यांना पक्षाच्या अध्यक्षा बनवायला हवे, कारण त्या आजच्या काळातील सर्वात लोकप्रिय चेहरा (Popular face) आहेत.

ते म्हणाले- दोन वर्षांपासून राहुल गांधींचे (Rahul Gandhi) मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर ते तयार नसतील तर प्रियंका गांधी यांना पक्षाच्या अध्यक्षा कराव्यात.आचार्य प्रमोद यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि प्रियंका गांधी यांच्यासमोर या गोष्टी सांगितल्या. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी ही मागणी केलेली नाही.

पक्षाचे खासदार दीपेंद्र हुड्डा (Deependra Hooda) यांनीही अशीच मागणी केली असून, प्रियंका गांधी यांना केवळ एका राज्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांना राष्ट्रीय पातळीवर आणावे. असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, चिंतन शिबिरातील काँग्रेस हायकमांडने असंतुष्टांच्या मोठ्या मागण्यांपैकी एक ‘संसदीय मंडळ’ स्थापन करण्याची सूचना मान्य केली आहे. या सूचनेला आता पक्षातील सर्वोच्च निर्णय घेणार्‍या काँग्रेस कार्यकारिणीच्या मंजुरीची आवश्यकता आहे.