संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला नाही तर मग ५५ लाख रुपये परत का केले?

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडानंतर शिवसेनेची बाजू एकहाती लावून धरणारे खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. गेल्या चार तासांपासून संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरु आहे. सध्याच्या एकूण घडामोडी पाहता संजय राऊत यांना ईडीकडून (ED) अटकही केली जाऊ शकते.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या टीकेमुळे दुखावले गेलेले भाजप आणि शिंदे गटाचे नेते आता त्यांच्यावर तुटून पडले आहेत. याच दरम्यान आता भाजपाने संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला नाही तर मग ५५ लाख रुपये परत का केले? अलिबागमध्ये जमिनी कुठून आल्या? असा खोचक सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी विचारला आहे.

कोविड काळात महाराष्ट्रात केलेला भ्रष्टाचार शिवसेना नेत्यांना पचणार नाही. तुरुंगात तर जावेच लागेल. संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला नाही तर मग ५५ लाख रुपये परत का केले? अलिबागमध्ये जमिनी कुठून आल्या?असा सवाल देखील अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.