‘संजय राऊत यांनी बोलणे बंद केले नाही तर, शिवसेना संपेल’

नागपूर :  राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि  धनंजय महाडिकांचा विजय (BJP’s Dhananjay Mahadik’s victory) झाला आहे. विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

दरम्यान, या निवडणुकीनंतर खासदार संजय राऊत हे सातत्याने भाजपला लक्ष्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे या विजयानंतर चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे दररोज सकाळी माध्यमांशी बोलतात. काहीही बोलतात आणि दिवसभर तेच वक्तव्य टिव्हीवर सुरु असल्याने शिवसैनिकही वैतागले आहे. त्यामुळे आता शिवसैनिकही म्हणायला लागले की, संजय राऊत यांनी बोलणं थांबवावं. अन्यथा शिवसेनाच लंबी होईल, असा खोचक टोला भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी लागावला.

नागपूरात माध्यमांशी ते बोलत होते. मुख्यमंत्री आणि त्यांच्या विश्वासाचा माणुस जर अपक्ष आमदारांना घोडा म्हणणार असेल, तर हा निश्चित गाढवपणा आहे असल्याची टीकाही त्यांनी केली. फक्त जनताच नाही तर सर्व पक्षांसह अपक्ष आमदार हे सुद्धा महाविकास आघाडीच्या कार्यप्रणालीमुळे वैतागलेले आहे. ज्यांचे मंत्री कमिशन घेतात, मुख्यमंत्री जनतेला भेटत नाही. तर जनतेचे काम कसे करणार. त्यामुळे शेतकरी शेतमजूर सगळे वैतागले आहे. या सरकारमुळे महाराष्ट्राचे वाटोळे होत आहे. लोकांना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळाची आठवण होत आहे. पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे असे जनतेला वाटत असल्याचेही ते म्हणाले.