नरेंद्र मोदी यांच्या विषयी अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या शेख हुसैनला अटक न केल्यास त्याचे थोबाड रंगवू – भाजप 

अमरावती – आम्ही नकली गांधी (Gandhi) आडनाव धारण केलेले नाही. आम्ही कर्मठ स्वातंत्र्यवीरांचे अनुयायी आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विषयी अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या नागपूर शहर काँग्रेस माजी अध्यक्ष शेख हुसैन (Sheikh Hussain) या इसमाला पोलिसांनी अटक न केल्यास आम्ही त्याचे थोबाड रंगवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (Shivrai Kulkarni) यांनी दिला आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी नॅशनल हेरॉल्ड (National Herald) प्रकरणी केलेला भ्रष्टाचार (Corruption) लपवण्यासाठी काल नागपूर येथे काँग्रेस ने आंदोलन केले. या आंदोलनात भाषण देताना शेख हुसैन याने ” मोदी कुत्ते की मौत मरेगा” असे अपमानजनक वक्तव्य केले. या देशातील कोट्यवधी जनतेने नरेंद्रजी मोदी यांनी लोकशाही मार्गाने पंतप्रधान पदावर आरूढ केले आहे. या पदाविषयी असे वक्तव्य करणे लोकशाहीचा खून आहे. शेख हुसेनच्या वक्तव्या वरून काँग्रेसची (Congress) मूळ संस्कृती उघड झाली आहे.

आज शिवराय कुळकर्णी यांनी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयंत डेहणकर यांच्यासह काँग्रेस नागपूरचे माजी अध्यक्ष शेख हुसैनच्या विरोधात बडनेरा पोलिसांत (Badnera Police )  तक्रार दाखल केली. शेख हुसैन चे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्यामुळे जातीय तणाव देखील निर्माण होऊ शकतो. शेख हुसैन यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास मोदी समर्थक त्याला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. परिणामी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून त्यास तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

पोलिसांनी गंभीर कारवाई न केल्यास शेख हुसैन चे थोबाड रंगवल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा शिवराय कुळकर्णी यांनी दिला आहे. आज तक्रार दाखल करते वेळी डॉ. वीरेंद्र ढोबळे, गजेंद्र भैसे, संजय कटारिया, विश्वजीत डुमरे, किशोर जाधव, राजू शर्मा, अन्नू शर्मा, उमेश नीलगिरे, किरण अम्बाडकर, गजानन परकाले, योगेश निमकर, संतोष मिश्रा, राहुल जाधव, सतनामकौर हुडा, छायाताई अम्बाडकर, रोशनी वाकले, अमृत यादव, शैलेश मेघवानी, अश्विनी कुरुमकर, सुनील लोयबरे, स्वर्णसिंह हुडा, प्रदीप सोलंके, प्रदीप पवित्रकार, बालू ठवकर, गजानन तरहेकर, सुनील चरडे, रवी मुळे, नरेश धामाई, विनय मोटवानी प्रामुख्याने उपस्थित होते.