Sukhvinder Sukhu | काँग्रेसने कर्नाटक, तेलंगाणा, हिमाचल प्रदेशात जाहिर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातील जनतेची दिशाभूल केली, त्याची सविस्तर चिरफाड काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या ऐतिहासिक पत्रकार करण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांचा आणि भाजपच्या नेत्यांचा खोटारडेपणा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उघडा करून भाजपाला चोख प्रत्युत्तर दिले. तसेच या गॅरंटी कशा पद्धतीने लागू केल्या आहेत व त्यांचा किती लोकांना लाभ झाला आहे, याची आकडेवारीसह सविस्तर माहिती दिली.
टिळक भवनातील ऐतिहासिक पत्रकार परिषदेत बोलताना हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू (Sukhvinder Sukhu) यांनी भाजपाचा खोटेपणा उघड करताना सांगितले की, सत्याला नेहमीच असत्याशी सामना करावा लागतो. महाराष्ट्रा प्रमाणेच हिमाचल प्रदेशनेही ऑपरेशन कमळचा सामना केला पण जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर आणि सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली. काँग्रेसचे सरकार येताच पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जूनी पेन्शन योजना लागू केली. ज्यांना ५००० रुपये मिळत होते त्यांना आता ५० हजार रुपये मिळत आहेत. मक्याला प्रतिकिलो ३० रुपये, गहू ४० रुपये किलो तर गाईच्या दूधाला प्रति लिटर ४५ तर म्हशीच्या दुधाला ५५ रुपयांचा हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. ५८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. १८ वर्षांवरील मुलींना १५०० रुपये तर वैद्यकीय शिक्षण, पीएचडी करणाऱ्या मुलींनाही आर्थिक मदत दिली जात असल्याचे सांगत या गॅरंटींची पूर्तता करण्यासाठी महसूल उत्पन्नाचे स्रोत वाढवले आहेत, असे सुख्खू यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, यु. बी. व्यंकटेश, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, प्रवक्ते चरणजित सप्रा आदी उपस्थित होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
चंद्रकांतदादांच्या पाठीशी कोथरुडकरांनी खंबीरपणे रहावे! माजी मंत्री सुरेश प्रभू यांचे आवाहन
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अमित ठाकरे यांनी दिले असे उत्तर
..तर पुढील मुख्यमंत्री फडणवीसच! अमित शाहांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या बड्या नेत्याचा दावा