दुसऱ्या टप्प्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास आम्ही त्यांच्यासोबत राहू – खोत

दुसऱ्या टप्प्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास आम्ही त्यांच्यासोबत राहू – खोत

मुंबई : गेल्या 17 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारने एक पाऊल पुढे येत एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक पगारवाढीनंतरही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठी घोषणा केल्यानंतरही संपावर तोडगा निघाला नाही.

दरम्यान, सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्के वाढ करणार असल्याची घोषणा केलीय. त्यानंतर आता आझाद मैदानावर सुरु असणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या सर्व घडामोडींवर आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कमी पडणारी रक्कम देणार आहे. दोन पावलं सरकार पुढं आलं आहे. पहिला टप्पा जिंकलो आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले,आम्ही दुसऱ्या टप्प्यात कामगारांनी आंदोलन केल्यास आम्ही त्यांच्यासोबत राहू. निलंबन आणि सेवासमाप्ती मागं करण्याचा निर्णय घेतला आहे. आज 12 पर्यंत कामगारांनी कामावर हजर व्हावं, असं सदाभाऊ खोत म्हणाले. हा कामगारांचा मोठा विजय आहे.”

 

Previous Post
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित - धानोरकर

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित – धानोरकर

Next Post

‘… म्हणून बोंडअळी निर्मूलनासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे’

Related Posts
काळी पडलेली तांब्याची भांडी 'या' उपायांनी करा स्वच्छ, दिसू लागतील एकदम नवी

काळी पडलेली तांब्याची भांडी ‘या’ उपायांनी करा स्वच्छ, दिसू लागतील एकदम नवी

How to Clean Copper: स्टील, सिरॅमिक, अॅल्युमिनियम आणि लोखंडी भांडी बहुतेक घरांमध्ये खाण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी वापरली जातात.…
Read More
'एक्झीट पोलचे सर्व अंदाज फोल ठरवत भाजपा परिवाराने विजयाची ‘हॅट्टट्रीक’ केली' | Haryana Vidhansabha Election

‘एक्झीट पोलचे सर्व अंदाज फोल ठरवत भाजपा परिवाराने विजयाची ‘हॅट्टट्रीक’ केली’ | Haryana Vidhansabha Election

Haryana Vidhansabha Election 2024 Result | हरियाणात भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या…
Read More
चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडी सरकारमुळे मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान; चंद्रकांत पाटील यांची टीका

मुंबई – राज्य सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांना आयएएस दर्जा देण्यासाठीच्या प्रक्रियेतील बैठकीस राज्यातील तीन वरिष्ठ अधिकारी वेळेत पोहोचले नाहीत…
Read More