त्यांना आमच्याशी बोलायचे असेल तर भाजपही सोबतही बोलावं लागेल – केसरकर

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात सध्या बराच संघर्ष सुरू असून मोठ्याप्रमाणात शिवसैनिक (Shiv Sainik) हे द्विधा मनस्थितीत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या विचारांच्या वारसदाराला साथ द्यावी की रक्ताच्या वारसदाराला मदत करावी असा यक्षप्रश्न सध्या सेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढे आहे. अनेकांनी विनंती करून देखील उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस – राष्ट्रवादीची (Congress – Nationalist Congress) साथ सोडायला तयार नसल्याने नेते मंडळी शिवसेनेला राम राम ठोकत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.

एका बाजूला हे चित्र असताना आता दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज एक लक्ष्यवेधी भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी (uddhav thackery) आम्हाला बोलावले तर आम्हालाही आनंद होईल. पण आता आम्ही एकटे नाही. आम्ही आता भाजप (BJP) बरोबर आहोत त्यामुळे त्यांच्याशीही संवाद साधावा लागेल.असं ते म्हणाले.

आम्ही संवाद साधत असताना आम्हाला थेट साहेबांशी बोलायचे आहे. मधले आजुबाजूचे लोक बाहेर ठेवून संवाद साधावा ही अपेक्षा आहे’असं म्हणत दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी शिवसेनेसोबत चर्चेची अपेक्षाच बोलून दाखवली आहे.