बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे सातत्याने आवाज उठवत होते. विशेषतः संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कथित जवळचे संबंध असल्याचा मुद्दा या नेत्यांकडून उपस्थित केला जात होता.
मात्र, आता हाच मुद्दा लावून धरणारे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.सुरेश धस यांनी ही भेट घेतल्याचे मान्य केले असून, ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते, असे स्पष्टीकरण दिले आहे.
“मी स्वत: दिवसा त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो, तर त्यात गजहब करण्यासारखं काय आहे?” असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या | Atul Londhe
मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर, १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार