माझ्यासोबत से’क्स केला तर मी तुला घोडा घेवून देईन; एलोन मस्कने दिली होती एअर होस्टेसला ऑफर

नवी दिल्ली- उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) हे त्यांच्या एका जुन्या प्रकरणामुळे सध्या चर्चेत आले आहेत. स्पेसएक्स कंपनीत (SpaceX Company) काम करणाऱ्या एअर होस्टेसकडून मसाज (Massage from the air hostess) घेत असताना मस्क यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual harassment) करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. मस्क यांनी त्यांचा शब्द मान्य करण्याच्या बदल्यात त्याने नवीन घोडा खरेदी करून देईन अशी ऑफर देखील दिली होती. एअर होस्टेसने विरोध केल्यावर तिच्यावर गुन्हा दाखल न करण्याच्या अटीवर तिला सुमारे 1 कोटी 75 लाख रुपयांची भरपाई देण्यात आली.

बिझनेस इनसाइडर (Business Insider) या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार , ही घटना २०१६ सालची आहे. ही महिला स्पेसएक्सच्या कॉर्पोरेट फ्लाइटमध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होती. एअर होस्टेसने त्याला सांगितले की फ्लाइट अटेंडंटची (Flight attendant)  नोकरी सुरू केल्यानंतर,  2016 मध्ये, ती मस्कच्या जेट विमान ‘Gulfstream G650ER’ च्या खाजगी केबिनमध्ये त्याला मसाज देत होती. मसाज करताना मस्कने तिच्यासमोर सेक्स करण्याचा प्रस्ताव (Proposal to have sex)  ठेवला.

एअर होस्टेसने सांगितले की, मस्कने तिला फुल बॉडी मसाजसाठी (Body massage) आपल्या खोलीत बोलावले. ती खोलीत गेल्यावर मस्क यांनी आपल्या शरीराचा खालचा भाग फक्त चादरने झाकून ठेवला होता. मसाज दरम्यान, मस्क तिला त्याचा प्रायव्हेट पार्ट (Private Part) दाखवत होते आणि मग त्यांनी  मसाज करण्यापेक्षा सेक्स (Sex) केल्यास तिला घोडा दिला जाईल असा प्रस्ताव दिला.

रिपोर्टनुसार, या आरोपांनंतर मस्कच्या कंपनी स्पेसएक्सने महिलेला 1 कोटी 75 लाख रुपयांहून अधिक रक्कम भरपाई म्हणून दिली होती. एअर होस्टेसच्या एका साथीदाराने तिच्या स्वाक्षरीने लिखित घोषणा केल्याचे या अहवालात म्हटले आहे. ज्यामध्ये एअर होस्टेसच्या दाव्याचे समर्थन करण्यात आले आहे. यामध्ये समाविष्ट असलेली सर्व माहिती काही कागदपत्रे, ईमेल (Email) आणि इतर रेकॉर्डवर आधारित असल्याचे अहवालात लिहिले आहे.